पंढरपूर सिंहगड मध्ये "सिंहगड हॅकॅथॉन -२०१९"
स्पर्धेचे उद्घाटन करताना मान्यवर
पंढरपूर सिंहगड मध्ये "सिंहगड हॅकॅथॉन २०१९" स्पर्धाचे आयोजन
पंढरपूर (प्रतिनिधी) भारत सरकारच्या नियमाप्रमाणे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिरिंग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात आजोजित करण्यात आलेल्या हॅकॅथॉन-२०१९ स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर, प्रा. कपिल दिवटे, प्रा. नामदेव सावंत, अॅकॅडमी डीन डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. विरेंद्र धोञे, विद्यार्थी प्रतिनिधी गौरंग कर्वे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयोजित केलेल्या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सलग २४ तास प्रोग्रॅम तयार करण्यासाठी मेहनत घेणार आहेत. या स्पर्धेत १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी सॉफ्टवेअर बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील २५ संघ म्हणजेच एकूण १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. कपिल दिवटे व त्यांची टीम यांनी काम पाहणार आहे. या स्पर्धेचे समन्वयक प्रा. वीरेंद्र धोत्रे सह विद्यार्थी प्रतिनिधी सुधाकर शिंदे हे काम पाहणार आहेत. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत, अमोल नवले, अभिजित पाटणे यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी २४ तास उपस्थित असणार असून वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत करण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये एक तास मनोरंजन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रथम बक्षीस पाच हजार रुपये तर द्वितिय बक्षीस तीन हजार रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र हे विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. नामदेव सावंत सह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यारी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा मुळे व वैभवी कुलकर्णी यांनी केले तर आभार विद्यार्थी प्रतिनिधी सुधाकर शिंदे यांनी केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________







0 Comments