पंढरपूर : आषाढी यात्रा 2019 मध्ये महाराष्ट्र पोलीस यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स यांच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, शहर पोलीस निरीक्षक डॉ. दयानंद गावडे, पी.आय. प्रशांत भस्मे, तसेच पंढरपूर शहर पोलीस कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्सचे पुणे विभागीय अधिकारी, व्हाईस प्रेसिडेंट, डेप्युटी रिजनल मॅनेजर श्री.शामलजी पांडा म्हणाले की, पोलीस प्रशासन आणि लाईफ इन्शुरन्समधील कर्मचार्यांचे काम हे सहकार्याचे आणि काही प्रमाणात मिळते-जुळते असते. लोकांना त्यांचे काम करत असताना आर्थिक संरक्षण देण्याचे काम इन्शुरन्स सेक्टर करत असते. एस.बी.आय. ही संस्था 151 वर्षापूर्वी ब्रिटीशांच्या कालावधीत स्थापन झाली होती. या संस्थेने बँकींग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केले आहे.
या एस.बी.आय. संस्थेच्या इन्शुरन्स कंपनीची सुरूवात 18 वर्षापूर्वी जेव्हा भारत सरकारने इन्शुरन्स सेक्टरचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस झाली होती. त्यावेळी एल.आय.सी.नंतर जर कुठल्या संस्थेला लायसन्स मिळाले असेल तर ती एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे. आज या इन्शुरन्स कंपनीच्या 824 शाखा आहेत. जे ग्राहक आमच्याकडून फायनान्शिअल मार्गदर्शन घेतात त्यांना सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या संस्थेला 2007-08 या वर्षी नं. 1 ब्रँड कस्टमर ब्रँड इंटरसिटीफ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्राहकांसाठी जे काही आम्ही करू ते कमीच आहे असे आम्ही मानतो, असेही ते यावेळी म्हणाले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
यावेळी डॉ. सागर कवडे म्हणाले, एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्सने केलेला सन्मान हा आषाढी यात्रा कालावधीत चांगले काम करणार्या पोलीस अधिकारी, कर्मचार्यांच्या पाठीवर दिलेली थाप आहे. ही थाप आम्हाला नक्कीच पुढे असेच चांगले काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. एस.बी.आय.ला अर्थकारणाची रक्तवाहिनीफ असे म्हणू शकतो. याशिवाय आपत्ती निवारणासारख्या समाजकारणातही ही संस्था अग्रणी आहे. भारतात जिथे जिथे गरज पडते तिथे एस.बी.आय. नेहमीच धावून येत असते. पंढरपूरात काम करण्याचे एक महत्व आहे. येथे भाविकांच्या सेवेसाठी काम करत असताना काही उपाययोजना राबविण्याची गरज आहे. यासाठी पोलीस प्रशासन असेच चांगले काम करेल, याची ग्वाही डॉ. कवडे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्सचे डिव्हीजनल मॅनेजर सुहास बेडककर, पंढरपूर ब्रँच मॅनेजर सज्जन चव्हाण यांच्यासह एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्सचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, माईंडवेवचे श्री.रोहन कौशिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments