अभियंत्यांनी हार्ड वर्क ऐवजी स्मार्ट वर्क करणे गरजेचे - उपाध्यक्ष संजय अंभोरकर


स्वेरीत ‘अभियंता दिन’ संपन्न तर ‘ऑलम्पस २ के १९’चे थाटात उदघाटन

पंढरपूर-‘सध्या विश्वाची नजर भारताकडे लागली असून एक महाशक्ती म्हणून भारत देशाकडे पहिले जात आहे. भारतातील नागरिकांच्या  मेंदूची कार्यक्षमता अफाट आहे. परंतु आपल्या मनातील एकूण ९५ टक्के विचार हे  पुनरावृत्ती होणारे असतात व केवळ पाच टक्केच विचार हे नवनिर्मितीक्षम असतात. यासाठी  प्रत्येकजण ज्ञानासाठी भुकेलेला असावा. तुम्ही तुमच्या ऊर्जेच्या आधारे जग बदलू शकता. आपण इच्छित ध्येय ठरवा आणि जे ठरवता त्याचा परिश्रम पूर्वक पाठलाग करा. खरोखर यशस्वी व्हाल. कारण जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. आपण नक्की काय करतोय ? हे आपल्याला जर पूर्ण समजले तर आपण आणखी जास्त आनंदी होतो. यातूनही आपल्या विचारांची क्षमता वाढवायची असेल तर आपण आणखी वाचन केले पाहिजे. एकूणच आपल्यासारख्या नूतन अभियंत्यांनी हार्ड वर्क ऐवजी स्मार्ट वर्क करणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन ह्युमन रिसोर्स अॅण्ड कम्युनिकेशनच्या ब्रेक्स इंटरनॅशनल, पुण्याचे उपाध्यक्ष संजय अंभोरकर यांनी केले.  

  येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटपंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘अभियंता दिनी’ व ‘ऑलम्पस २ के १९’ या राष्ट्रीय संशोधन स्पर्धा कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमूख पाहूणे म्हणून ह्युमन रिसोर्स अॅण्ड कम्युनिकेशनच्यासी ब्रेक्स इंटरनॅशनल, पुण्याचे उपाध्यक्ष संजय अंभोरकर हे उपस्थितांना मागदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याच्या सिंटेल टेलीकॉम कंपनीचे प्रमुख एच आर. सुधीर मतेती हे होते. भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम्म विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेच्या पुजनानंतर प्रास्तविकात ‘ऑलम्पस २ के १९’ चे विद्यार्थी अध्यक्ष नितीन टेळे यांनी शोध तंत्रस्पर्धेत ३१ इव्हेंट असून यासाठी जवळपास दोन लाखांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती देत स्पर्धेची संपूर्ण माहिती दिली. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी संस्थेच्या वाटचालीची संपुर्ण माहिती देवून कमवा व शिका योजना, संशोधन विभाग, मिळालेली राष्ट्रीय मानांकने व इतर शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. डॉ. मिनाक्षी पवार, डॉ. विध्याराणी क्षीरसागर, डॉ. एम.एम.अवताडे, डॉ. दीप्ती तंबोळी यांनी  स्वतःचे घर आणि कॉलेज अशी दुहेरी भूमिका सांभाळून अत्यंत परिश्रमाने पीएच. डी. पूर्ण केल्यामुळे स्त्री शक्तीचा विशेष गौरव केला. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठ सोलापूरचे राज्यपाल नियुक्त अधिसभेचे सदस्य मोहन डांगरे यांनी स्त्री शक्तीचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे असे सांगून स्त्री शक्तीचा जागर हे विविध उपक्रमातून होऊ शकतो.’ असे सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना एच आर. सुधीर मतेती म्हणाले की,‘ स्वतःला कधीच कमी लेखू नका. आपण सर्वजण एकमेवाद्वितीय आहोत. आपण  कार्याने सर्वजण इतिहास रचू शकतो. देव देवळात नसतो तर तो तुमच्या स्वतःमध्येच असतो. तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात.


 समाजाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असते त्यामुळे समाजाचे देणे लागते हे ओळखून सर्वजण समाजासाठी कार्य करावे हे खूप महत्त्वाचे आहे.’ असे सांगून कॉलेजच्या शिस्तीचे कौतुक केले. यावेळी कमवा व शिका योजनेतील आकांक्षा सोनवलकर, ऐश्वर्या बेताडे, प्रियांका कांबळे, ऋतुजा गायकवाड, गायत्री आवारे, रोहिणी चव्हाण, ज्ञानेश्वरी दास, वैष्णवी धांडोरे, आलीशा मुलाणी, दिपाली अनपट, करीम बागवान, प्राजक्ता घोडके या गरीब व होतकरू विद्यार्थीनींसह जवळपास २६५ ड्रेस डिप्लोमासाठी व ३०० ड्रेस डिग्री अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीसाठी असे मिळून सहाशे दहाहून अधिक ड्रेसचे वाटप यावेळी करण्यात आले.

 ‘ऑलंम्पस’च्या निमित्ताने अभियांत्रिकीचे सर्व विभाग आकर्षक पध्दतीने सजविले होते व विभागातील महत्वाच्या प्रयोगशाळा खुल्या ठेवल्या होत्या. यावेळी लातूरच्या महीला शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सीमा आगरकर, नरखेड महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन मोटे, मनिष देढीया, सौ वैशाली अंभोरकर, सौ. हर्षा मतेती, सचिन हिरेमठ, संस्थेचे माजी उपाध्यक्ष एन.एस. कागदे, संस्थापक जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, ‘ऑलम्पस २ के १९’ चे समन्वयक प्रा. डी.टी. काशीद, विविध विभागाचे प्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन आकांक्षा पाटील व ऋचा तामाणे व प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर ‘ऑलम्पस २ के १९’ विद्यार्थी खजिनदार नागेश रोंगे यांनी आभार मानले.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments