पंढरीतील अर्जुन जाधव यांनी प्रोडक्शन निरीक्षक केलेला ‘खिचीक’ हा मराठी चित्रपट उद्या प्रदर्शित होणार... सिध्दार्थ जाधव, प्रथमेश परब, प्रितम पाटील या दिग्गज कलाकारांची प्रमुख भुमिका


पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरीतील अर्जुन जाधव या हरहुन्नरी कलाकाराने प्रोडक्शन निरीक्षक म्हणुन काम पाहिलेला ‘खिचीक’ हा बहुचर्चित नुतन मराठी चित्रपट उद्या दि. 20 सप्टेंबर रोजी संपुर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

 ‘लक्ष’ ही लोकप्रिय मराठी मालिका, रॉबिनहुड के पोते, बाजीराव मस्तानी, बाहुबली, पोस्टर बॉईज या लोकप्रिय हिंदी चित्रपटात व परप्युम, गुरु या मराठी चित्रपटात महत्वपुर्ण भुमिका साकारणारे अर्जुन जाधव हे पंढरीतील हरहुन्नरी कलाकार आता प्रोडक्शन निरीक्षक म्हणुनही काम पहात आहेत. त्यांनी प्रोडक्शन निरीक्षक म्हणुन काम पाहिलेल्या ‘खिचक’ या मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे निर्माते सचिन धकाते हे असुन, दिग्दर्शक प्रितम पाटील हे आहेत. चित्रपटात सिध्दार्थ जाधव, प्रथमेश परब, प्रितम पाटील या दिग्गज कलाकारांची प्रमुख भुमिका आहे. संगीत अभिषेक दत्ता यांचे असुन दिग्गज गायकांचे पार्श्‍वगायन आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे परिसरात झाले आहे. पंढरपूर शहरातील अर्जुन जाधव यांच्या सारखा एक उमदा तरुण चित्रपट क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहे. त्यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणापासुन ते प्रदर्शित होईपर्यंत सर्व महत्वपुर्ण कामगिरी पार पाडली आहे. त्यांच्या रुपाने पंढरपूर मधुन एक भावी चित्रपट निर्माता निर्माण होण्याच्या दिशेकडे झेप घेताना आढळत आहे.  ‘‘हा चित्रपट सर्वांनी अवश्य बघावा, चित्रपट पाहिल्यानंतर याबाबतच्या प्रतिक्रिया कळवाव्यात.’’ अशी विनंती अर्जुन जाधव यांनी प्रेक्षकांना केले आहे. पंढरपूर लाईव्ह कडून ‘खिचीक’ च्या संपुर्ण टीमला व अर्जुन जाधव यांना शुभेच्छा!


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments