पंढरीत रेल्वे अंगावरून गेल्याने रेल्वेखाली सापडलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री उशिरा येथील नवीन बसस्थानकाजवळील रेल्वे ट्रॅक वर घडली.
आज सकाळी रेल्वे ट्रॅक वरून जाणाऱ्या काही लोकांनी ही घटना पाहिल्यानंतर अपघात झाल्याचे समोर आले. सोमवारी परिवर्तन एकादशी होती एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी आले होते. एकादशी निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी आलेले बाहेरगावचे हे भाविक असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
मृत्यु झालेल्या एका व्यक्तीच्या हाताच्या मनगटावर विठ्ठल रुक्मिणीचे चित्र गोंदण्यात आलेले आढळून आले. यावरून हे भाविक असावेत. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
यामधील एका व्यक्तीच्या अंगावर जांभळ्या रंगाचा तर दुसऱ्याच्या अंगात लाल रंगाचा शर्ट आहे. रेल्वेच्या धडकेमुळे दोघांचा ही मृत्यूदेह छिन्न-विच्छिन अवस्थेत पडलेले आढळले. याप्रकरणी अधिक तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
0 Comments