अवघड विषयाचा अभ्यास अगोदर करा- प्राचार्य डॉ. कैलाश करांडे पंढरपूर सिंहगड मध्ये थेट द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत

          पंढरपूर (प्रतिनिधी) डिप्लोमा करून आलेल्या विद्यार्थ्यांकडे खुप वेळ कमी असतो. त्यामुळे जबाबदारी वाढते कमी वेळत योग्य नियोजन आवश्यक आहे. एखादा विषय अवघड असेल तर त्या विषयाचे जादा तास महाविद्यालयाने सुरू केले आहेत. यापुढील दोन वर्षात मेहनत घेतली पाहिजे. स्वत:च्या अभ्यासाचे वेळापञक तयार करा म्हणजे तुम्हाला त्यापद्धतीने वेळ देता येईल. तुमच्या स्वतःच्या कल्पनेतून एक प्रोजेक्ट तयार केल्यास तुमच्या ज्ञानात भर पडेल. महाविद्यालयातील सर्व स्पर्धेत सहभाग घेतला तर तुमचा आपोआप विकास व करिअर होईल असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
   कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्वागत समारंभ कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेअॅकॅडमी डीन डाॅ. रविंद्र व्यवहारेडाॅ. श्याम कुलकर्णीडाॅ. अल्ताफ मुलाणीट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट ऑफिसर डाॅ.राजश्री बाडगेप्रा. नामदेव सावंत आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.   
    थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी म्हणालेअभियांत्रिकी शिक्षणाचे उत्कृष्ट सुविधा असलेले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय असुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नामांकित व्याख्याते यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात येते. विविध विभागात वर्कशॉप आयोजित करण्यात येतात यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असल्याचे मत डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी व्यक्त केले.   
      ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट ऑफिसर डाॅ. राजश्री बाडगे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्यासिंहगड फॅमिली मध्ये तुम्ही सहभागी झाला आहात. महाविद्यालयात घेतल्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक आहे. महाविद्यालयात व्यक्तीमत्व विकास कार्यक्रम घेण्यात येतात त्यामध्ये सहभाग होण्याचे आवाहन डाॅ. राजश्री बाडगे यांनी केले.   
  महाविद्यालयाचे अॅकॅडमी डीन डाॅ. रविंद्र व्यवहारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणालेथेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी शिक्षणाबद्दल जास्त आत्मविश्वास असतो त्यामुळे विद्यार्थी पास होण्यापुर्ताच अभ्यास करतात असे न करता करिअरच्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. शैक्षणिक आयुष्यात वेळ वाया घालवू नका. महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालय आहे तेथे जाऊन अभ्यास करा असे मत डाॅ. रविंद्र व्यवहारे यांनी व्यक्त केले.    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन कुमारी वैभवी कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार कुमारी अनुजा मुळे यांनी मानले

फोटो ओळी:- पंढरपुर सिंहगड महाविद्यालयात आयोजित केलेल्या थेट द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या स्वागत प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे समोर उपस्थित विद्यार्थी.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments