पंढरपूर– गोपाळपूर (ता. पंढरपूर)श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित बी फार्मसीच्या तिसर्या आणि चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रीयल रिव्याल्युशन ४.० इंडस्ट्री ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.फार्मसीमध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमात औरंगाबादच्या इंडो जर्मन टूल रूमचे एम.एस. एम. ई. टेक्नोलॉजी सेंटरच्या ट्रेनींग सेंटरचे इंजिनिअर महेश नवले हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
सुरुवातीला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ यांनी या प्रोग्रामबाबत सविस्तर माहिती दिली. या दोन दिवसीय कार्यक्रमात नवले यांनी इंडस्ट्री ४.० चा संपूर्ण इतिहास सांगून त्याचा परिणाम आणि इंटरनेट यावर सविस्तर माहिती दिली. फार्मसीनंतर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात ह्या ट्रेनिंग प्रोग्रामचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
इंडस्ट्री ४.० यामध्ये स्वयंचलितकरण (अॅटॉमायझेशण), मशीन–लर्नींग, इंडस्ट्री प्रोसेसेस याबाबतची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच इंडस्ट्रीयल रिव्याल्युशन ४.०, प्रोडक्ट डिझाईन युजींग थ्रीडी प्रिंटर या मुख्य विषयावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. यावेळी प्राचार्य डॉ. अमित गंगवाल,डॉ. मिथुन मणियार, प्रा. रामदास नाईकनवरे, प्रा. वृणाल मोरे यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा साळुंखे यांनी केले तर डॉ. संजीव कुमार यांनी आभार मानले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments