युनिक गोल्डस्मिथ फोरमचे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण संपन्न


                                        प्रतिभावंतांच्या संगमामुळे बदल शक्य
                                                            -  मा. रेखाताई जडे


पंढरपूर (प्रतिनिधी) :-“ वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिभावंतांच्या संगमामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात सकारात्मक
 सामाजिक बदल अधिकाधिक सहज सुलभतेने शक्य होऊ शकेल.” असे मत ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक
 कार्यकर्त्या  रेखाताई प्रकाश जडे यांनी व्यक्त केले. त्या युनिक गोल्डस्मिथ फोरम, महाराष्ट्रच्या सर्व
 शाखीय सुवर्णकार शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण
 सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. पुढे बोलताना रेखाताई जडे म्हणाल्या
 “ शिक्षक आणि ज्ञानदान करणारे सर्व समाजबांधव हे निश्चितच प्रतिभावंत आहेत.” याप्रसंगी सोनार सेवा
 महासंघाचे प्रदेश संघटक  बजरंग खर्जूले म्हणाले “ शिक्षकांचा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने गुरुवंदना
 आहे.” तर युनिक गोल्डस्मिथ फोरम महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स होल्डर
 कवी  रवि वसंत सोनार-दहिवाळ या सोहळ्यात बोलताना म्हणाले “ शिक्षकांसारख्या गुणवंतांचा सत्कार
 करण्याचे भाग्य लाभणे हे अतिशय आनंददायी आहे. येथून पुढे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात सकारात्मक
 कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी युनिक गोल्डस्मिथ फोरम विशेष
 प्रयत्नशील राहील.” 

   यावेळी सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका  अनुराधाताई पंडीत यावेळी म्हणाल्या
 “शिक्षक हे भावी पिढी घडविण्याचे काम करत आहेत. त्यांचा यथोचित गौरव होणे आवश्यक आहे.”
 सोलापूर जिल्हा सोनार महासंघाचे उपाध्यक्ष  चंद्रकांत वेदपाठक म्हणाले “ सामाजिक जडणघडणीत
 शिक्षकांचे मार्गदर्शन व योगदान अनमोल आहे.”

   युनिक गोल्डस्मिथ फोरम महाराष्ट्रच्या या सत्कार सोहळ्यात लाड सोनार समाज पंढरपूरचे अध्यक्ष
  दत्ताशेठ इंदापूरकर आणि पांचाळ सोनार समाज पंढरपूरचे अध्यक्ष अनंत तरकसबंद हेही उपस्थित होते.   
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

  समाजातील विविध क्षेत्रातील या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते जीवनसाथीसह
 प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, महावस्त्र, पदक, सन्मानबिल्ला, मानाचा फेटा, ग्रंथसंच आणि पुष्पगुच्छ देऊन
 श्रीमती स्वाती मुकुंदराव अडाणे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धामणगाव आवारी, तालुका - अकोले.
 जिल्हा - अहमदनगर.), सौ.सीमा प्रदीप भांदर्गे (म .न. पा. शाळा क्रमांक - 18, प्रविणनगर, तालुका व जिल्हा - अमरावती.), सौ. प्रिती उदय बु-हाडे (छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक शाळा, भुतकरवाडी, तालुका व जिल्हा - अहमदनगर), सौ. कल्पना कैलास जाधव - चव्हाण (बेस्ट इंग्लिश मेडिअम स्कूल, सटाणा, ता. बागलाण जिल्हा नाशिक), शीतल विष्णू जडीतकर (मॉडर्न पब्लिक स्कूल, तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ),  व्यंकटेश रामचंद्र काटकर (नरहर कुरुंदकर हायस्कूल, नवीन कौठा, पोस्ट - सिडको, नांदेड)  राजेश वासुदेव क्षीरसागर
 (न्यू सातारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पंढरपूर जिल्हा सोलापूर.), श्रीमती जया जगन्नाथ कुलथे
 (जि.प. प्रा. शाळा चोंभूत, तालुका - पारनेर जिल्हा - अहमदनगर), सौ. शोभा भारत माळवे
 (शहीद मेजर कुणाल गोसावी अंधशाळा पंढरपूर जिल्हा सोलापूर.), शशिकांत ज्ञानेश्वर पोतदार
 (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंडगेवस्ती, तालुका - पंढरपूर. जिल्हा - सोलापूर),
 धनंजय सुरेश राजुरकर (ब्रह्मनाथ विद्यामंदिर, पारुंडे, तालुका - जुन्नर जिल्हा - पुणे),
रमेश दत्तात्रय सारोळकर (जि.प. प्राथमिक शाळा , जयपूर लांडे. तालुका - खामगाव. जिल्हा- बुलडाणा),
 मोहन हरिश्चंद्र सोनार (म्युनिसिपल न्यु इंग्लिश स्कूल, तालुका - शहादा जिल्हा - नंदुरबार) प्रा. शंतनू भारत
 वेदपाठक (संदिपानी टेक्निकल कॅम्पस फॅकल्टी आॅफ इंजिनिअरिंग, तालुका व जिल्हा - लातूर)
 व सूर्यकांत दत्तात्रय पारखे (उमा महाविद्यालय, तालुका - पंढरपुर.  जिल्हा - सोलापूर) या शिक्षण क्षेत्रात
 कार्यरत असणाऱ्या गुणवंतांचा युनिक टीचर अॅवार्ड 2019 हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

_________________________________________________


_________________________________________________

   महाराष्ट्रातील शिक्षण व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित असलेल्या सदर पुरस्कार सोहळ्याचे
    प्रास्ताविक युनिक गोल्डस्मिथ फोरम महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष मा. रवि वसंत सोनार-दहिवाळ
    यांनी केले. सौ सीमाताई चिंचोळकर यांनी सुश्राव्य असे सूत्रसंचालन केले. सदर पुरस्कार वितरण
    सोहळा यशस्वी करण्यासाठी सौ. सविता रवि सोनार, रोहित सोनार, रेवती सोनार, ओंकार सोनार,
    गौरव सोनार, अथर्व सोनार तसेच सर्व शाखीय सुवर्णकार बंधूं-भगीनींनी विशेष परिश्रम घेतले.


_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments