पंढरपूर (प्रतिनिधी):- येथील फिनीक्स या इंग्रजी माध्यमातील शाळेत शिक्षण घेणार्या कल्याण हरी परचंडे या इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यावर अश्लील चाळे केल्याचा गंभीर आरोप करुन सदर विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश नाकारल्यामुळे पंढरीत मोठी खळबळ निर्माण झाली होती. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यावर अशा प्रकारचा आरोप झाल्याने सदर शालेय प्रशासनाविरुध्द सर्वत्र संताप व्यक्त झाला होता. पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक विक्रम शिरसट यांनी या विद्यार्थ्याला न्याय मिळवुन देण्यासाठी शालेय व्यवस्थापना विरुध्द शिक्षण अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, नगरपरिषद शिक्षण मंडळ आदी प्रशासकीय स्तरावर तक्रार केली होती. कल्याण परचंडे या पहिलीतील मुलावर खोटे-नाटे गंभीर आरोप शालेय प्रशासनाने केल्याचा गुन्हा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या प्रयत्नास अखेर यश मिळाले असुन शिक्षणाधिकार्यांच्या आदेशानुसार आज दि. 19 सप्टेंबर रोजी कल्याण परचंडे या विद्यार्थ्यास शाळेत हजर करण्यात आले. आरटीई चा लाभार्थी असलेल्या कल्याण परचंडे या आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यास न्याय मिळाल्याने मुलाच्या पालकांनी पोलीस प्रशासन, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार व नगरसेवक विक्रम शिरसट यांचे आभार व्यक्त केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
पंढरपूर नगर पालीकेच्या औद्योगिक वसाहतीत बेकायदा बांधकाम करुन चालविण्यात येत असलेल्या फिनिक्स इंग्लीश स्कुल हे यापुर्वीही वादाच्या भोवर्यात अडकलेले आहे; परंतु सध्याचा हा प्रकार मात्र अतिशय गंभीर स्वरुपाचा असुन शासनाच्या गरीब विद्यार्थ्यांना नामांकित शिक्षण संस्थेत राखीव जागा ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शिक्षण हक्क कायद्याच्या माध्यमातून या शाळेत प्रवेश घेतलेल्या पहिलीच्या विद्यार्थ्याच्या पालकाकडे, ‘‘आमची शाळा प्रतिष्ठीत आणि नामांकित आहे या शाळेत तुमच्या मुलाला फुकट प्रवेश मिळाला आहे. पण आम्हाला संस्था चालवायची आहे तुम्हाला फी भरावीच लागेल’’ अशी तंबी शाळेच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली होती. मात्र तरीही सदर पालकाने फी भरण्यास नकार दिल्यानंतर मुलास शाळेतून काढून टाकले जाईल अशी धमकी देण्यात येत होती. मुलांना शाळेतून काढूण टाकले जाईल या भीतीपोटी सदर पालकाने 7 हजार रुपये शाळेकडे भरले परंतू त्यास कॉम्पुटरसाठी म्हणून पावती देण्यात आली. मात्र पुन्हा शाळा व्यवस्थापनाकडून आणखी रकमेची मागणी होऊ लागताच पालकाने नकार दिला असता सदर इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यास गैरवर्तन करणे,अश्लील चाळे करणे अशा प्रकारचा आरोप ठेवून शाळेतून काढून टाकण्यात आल्याने सदर विद्यार्थ्याचे पालक हरिश परचंडे यांनी न्यायासाठी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पोलीस, प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. याप्रकरणी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी त्यांना पाठबळ देवुन मोलाची कामगिरी निभावली.
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
‘‘यापुढे गोरगरीब विदयार्थ्यांना ‘फी’ न भरल्याच्या कारणावरुन कोणत्याही शाळेने अशा प्रकारचे खोटे-नाटे आरोप केले किंवा शाळेत बसु न देणे, परीक्षेस बसु न देणे, मानसीक ताण-तणाव देणे असे प्रकार केले तर त्याची गय केली जाणार नाही.’’ असा इशारा नगरसेवक विक्रम शिरसट यांनी दिला आहे. ‘‘गोरगरीबांच्या मुलांनीही चांगले शिक्षण घ्यावे हा त्यांचा अधिकार आहे. व यासाठी शासनाने योग्य त्या तरतुदी केलेल्या आहेत. परंतु केवळ ‘पैसे कमविणे’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन कांही इंग्रजी माध्यमांच्या शाळा गोरगरीब विदयार्थ्यांना अशा प्रकारे बदनाम करुन अन्याय करत असल्याचे आढळुन येत आहे. हे प्रकार थांबण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.’’ अशी माहिती नगरसेवक विक्रम शिरसट यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments