Video
गेल्या पाच वर्षातील आमचा स्वच्छ व पारदर्शक कारभार जनतेने पहिला आहे.त्यामुळे संपूर्ण जनता आमच्या सोबत आहे. दिशाभूल करणे, खोटी आश्वासन देणे यापलीकडे गेली 15 वर्ष विरोधकांनी काहीच केलं नाही. गेल्या पाच वर्षात शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो.शेतकर्यांना कर्ज माफी दिली, वेग वेगळी मदत मिळवुन दिली असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते मंगळवेढा येथील सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मंगळवेढा-पंढरपूर हा मतदारसंघ संतांची भूमी आहे म्हणून इथला उमेदवार हा संतांचे आचरण करणारा असावा याकरताच राजकारणातील संत समजले जाणारे सुधाकरपंत परिचारक यांना उमेदवारी दिली. आज याठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जनता उपस्थित आहे. हे पाहता परिचारक यांचा विजय निश्चित आहे. 24 तारखेला फक्त निकालाची औपचारिकता बाकी आहे.
यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,उमेदवार सुधाकरपंत परिचारक,आ.प्रशांत परिचारक,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा,कल्याण काळे,नगरसेवक अजित जगताप, माजी आ.शहाजी पाटील,शिवाजी सावंत,उमेश परिचारक,संभाजी शिंदे,शशिकांत चव्हाण,माजी सभापती शिवानंद पाटील,शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,अरुण किल्लेदार आदीजन उपस्थित होते.
जो पर्यंत जनावरांना चारा उपलब्ध होत नाही तो पर्यंत चारा छावण्या सुरू ठेवल्या. शेतकर्यांना मदत करून त्यांच्या शेतीलाही पाणी दिले.दुष्काळातही शेतकर्यांना दिलासा मिळवुन दिला.
हे सरकार सामान्यांचे, गरिबांचे, शेतकर्यांचे सरकार आहे.संत बसवेश्वर,चोखामेळा यांचे स्मारकाचे काम लवकरच पूर्णत्वाला नेणार असून सुधाकरपंतांना निवडून द्या आम्ही येथील सर्व योजना मार्गी लावु. असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सभेचे प्रास्ताविक आ.प्रशांत परिचारक, सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले तर आभार औदुंबर वाडदेकर यांनी मानले.
या सभेसाठी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
शेतकरी संघटनेचे नेते कार्यकर्ते ताब्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौर्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मतदारसंघ अध्यक्ष व काही माजी सैनिकांना ताब्यात घेतले आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटना मतदारसंघ अध्यक्ष राहुल घुले यांच्या निवासस्थानावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यासमवेत शहरातील काही प्रमुख माजी सैनिकांना देखील ताब्यात घेतले होते.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments