Pandharpur Live :-
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांच्या पंढरपूर तालुक्यात प्रचंड आणि उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी ट्रॅक्टरमध्ये समाधान आवताडे यांना बसवून मिरवणूकीने त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. त्यानंतर होणा-या सभांनाही प्रचंड जनसमुदाय प्रतिसाद देत आहे. खर्डी,उंबरगांव, बोहाळी,कोर्टी, शिरढोण, कौठाळी, वाखरी, टाकळी, गादेगांव आदि गावांमध्ये समाधान आवताडे यांनी गुरुवारी प्रचार दौ-याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रचार सभांमध्ये बोलताना अपक्ष उमेदवार समाधान आवताडे म्हणाले, पाण्याच्या प्रत्येक पाळीसाठी जनतेला भांडत बसण्याची वेळ आलेली आहे. जे हक्काचे आहे तेही मिळत नाही. तुमच्या हक्काचे पाणी बारामती, माढयाला कुणी पळविले हे जनतेला माहित आहे. आजपर्यंत सत्ता उपभोगण्यासाठीच सत्तेचा वापर लोकप्रतिनिधीनी केलेला आहे. पंढरपूरमध्ये अशांतता माजविणे, अपप्रवृत्तीला जोपासणे याशिवाय कोणतेच काम झालेले नाही. ही निवडणूक वेगळया दिशेने नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. एकमेकांवर घसरुन टिका-टिपण्णी करायची आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवायचे हाच उद्देश यामागे आहे. पंढरपूर येथे भरणारा घोड्याचा बाजार इतरत्र गेला, त्यामुळे बाजारपेठेतील उलाढालीवर त्याचा परिणाम झाला आहे. या भागामध्ये फळबागांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, या मालाला चांगला दर आणि चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. मी बोलतो कमी पण काम मात्र जास्त करतो. अगोदर काम करतो आणि नंतर बोलणा-यातील मी आहे. कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता मला साथ द्या, मतदारसंघाच्या विकासासाठी साथ द्या , मी कायम तुमच्या सोबत असेन असे शेवटी समाधान आवताडे म्हणाले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
या प्रचार सभांमध्ये बोलताना विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक शेखरभाऊ भोसले म्हणाले, या मतदारसंघासाठी समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. आता जनतेनीच ही निवडणूक हातात घेतली असल्याने परिवर्तन अटळ असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी शांतीनाथ बागल, सत्यवान रोंगे, औदुंबर शिंदे, डॉ.वृशाली पाटील,प्रशांत मलपे,समाधान चौगुले,राजकुमार पवार, मधुकर कुलकर्णी, मारुती नागटिळक, जावेद इनामदार, दादासो तळेकर,विक्रम चंदनशिवे,अरुण जाधव सोमनाथ झंजे, सुनिल गायकवाड आदिनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सुत्रसंचालन दिगंबर यादव व अशोक उन्हाळे यांनी केले.
सदरच्या प्रचार दौ-यामध्ये चंद्रभागा साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाष यादव, दत्तात्रय जमदाडे, विनोद लटके, मोहनआप्पा बागल, कुबेर पाटील, सत्यवान रोंगे, बाळासाहेब रोंगे,नाना देठे, संतोष व्यवहारे, बाळासाहेब डोके, अनिल कांबळे,सदाशिव मस्के, पांडूरंग पोरे,गणेश टिंगरे, सुधाकर फाटे, सतिश बागल,सुनिल गायकवाड, औदुंबर शिंदे, दत्तात्रय कोळेकर, सत्यवान मस्के, बाळासो सकटे,औदुंबर शिंदे, जावेद इनामदार,बंडूलाल ताड, विक्रम सकटे, योगेश कांबळे, शाहरुख शेख, आकाश मस्के, तानाजी नागटिळक, मारुती नागटिळक, अच्युत पाटील, रामकृष्ण पोरे, सिताराम नागटिळक, विजय नागटिळक, हमीद इनामदार, सतिश नागटिळक, सुधाकर जाधव, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब विष्णू जाधव, तानाजी जाधव, उत्तम जाधव, विक्रम चंदनशिवे,बिभीषण रणदिवे, पांडूरंग रणदिवे, सुरेश गायकवाड, सतिश शिंदे, दत्ता साळुंखे, सोमनाथ भाकरे, शंकर भाकरे यांचेसह वरील गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, विविध पदाधिकारी, समर्थक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुवारी संपन्न झालेल्या प्रचार दौ-यामध्येही समाधान आवताडे गटात प्रवेश करणा-यांचे इनकमींग सुरुच होते. यामध्ये शिरढोण येथे ग्रामपंचायत सदस्या अलका भुसनर, गणेश टिंगरे, कौठाळी येथे माजी उपसरपंच मारुती नागटिळक, पांडूरंग नागटिळक, रामचंद्र नागटिळक, सिताराम नागटिळक, बाळासो लेंडवे, गोरख नागटिळक, अमजद इनामदार, मुरलीधर नागटिळक, रवी नागटिळक, वाखरी येथे पैलवान धनाजी पांढरे, तानाजी पांढरे, राहूल पांढरे यांचेसह अनेकांनी समाधान आवताडे गटात प्रवेश करुन जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments