यारोकी अॅप्लिकेशनमुळे शालेय विद्यार्थ्यांना गणित सोडवणे सोयीस्कर होईल
- यारुकी इंडियाचे संचालक अनुराग गुप्ता
पंढरपूर– ‘सुरुवातीला आम्ही प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर यारोकी या गणिती पद्धतीचा अवलंब लोटस इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांवर करून पाहिले असता लोटसच्या विद्यार्थ्यांनी पुण्या-मुंबईच्या विद्यार्थ्यांना देखील मागे सारून गणितातील आवड स्पष्ट केले. यावरून आम्ही पुन्हा हीच पद्धत जिल्ह्यातील सी.बी. एस. ई.पॅटर्न इंगजी स्कूलच्या विद्यार्थ्याना शिकविण्याचे ठरविले म्हणून आज विद्यार्थी व गणिताचे शिक्षक यासाठी उपस्थित राहिले असून ही सोपी व सहज पद्धत आहे यामुळे विद्यार्थी गणित विषयाकडे आवड म्हणून पाहताना भविष्यात टॅबलेटचा वापर करून विद्यार्थी गणिताचा अभ्यास करू शकतात आणि डिजिटल इंडियाचे आव्हान यशस्वीरित्या पेलू शकतात.यामुळे गणिताचे शिक्षण घेणे आता सोपे झाले आहे.’ असे प्रतिपादन टोकीयो (जपान)च्या टोपान प्रिंटिंग कंपनी लिमिटेडच्या ‘यारोकी इंडिया’ सॉफ्टवेअरचे संचालक अनुराग गुप्ता यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये टोकियो (जपान) येथील टोपान प्रिंटींग कंपनी लिमिटेडचा भाग असलेले ‘यारोकी इंडिया’ सॉफ्टवेअरचे संचालक अनुराग गुप्ता यांच्यासह त्यांचे उच्चस्तरीय अधिकारी आले होते. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी मधील जवळपास बेचाळीस शाळेतील प्राचार्यांसह १०२ शिक्षक आणि चारशेहून अधिक विद्यार्थ्याना संचालक गुप्ता मार्गदर्शन करत होते. प्रारंभी क्रांतीकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त भगतसिंग यांच्या प्रतिमा पूजनाने आणि संगीत शिक्षक सुदर्शन कुंभार व विद्यार्थी कृष्णराज भोसले यांच्या सुमधुर तबला वादन आणि शिक्षिका सुप्रिया कोळी यांच्या नेतृत्वाखाली केलेला कथक नृत्य तसेच शहीद कुणाल गोसावी यांच्यावर आधारित लढाऊ सैनिकांच्या भूमिकेतून साकारलेल्या शत्रूवरील हल्याच्या अभिनयाला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी ‘लोट्सच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश आणि यारुकी अॅप्लिकेशनमुळे भविष्यात होणारा फायदा’ याबाबत सविस्तर माहिती दिली. यारोकीचे जपान मधील चेअरमन औकी कजिरो यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लोट्सच्या विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती सांगून यारोकी या गणिती पद्धतीची सविस्तर माहिती दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे म्हणाले की,‘प्रचंड परिश्रमाला मार्गदर्शनाबरोबरच योग्य दिशेची जर जोड दिल्यास आपले करिअर यशस्वी होते.’ असे सांगून प्रसिद्ध तत्ववेत्ता मार्क ट्विनच्या यशाचे गुपीत सांगताना विद्यार्थ्यांनी ‘हार्ड वर्क’ करण्याची गरज असल्याचे डॉ. रोंगे यांनी सांगितले. यावर उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन ट्वीनच्या यशाच्या रहस्याचे अनुकरण करणार असल्याचे सांगितले. चिमुकली मुले खूप हुशार होती. झटपट उत्तर देत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला डॉ. रोंगे सरांनी चक्क सॅल्युट ठोकले. प्रमुख पाहुणे स्वेरीचे अध्यक्ष प्रा.सी.बी. नाडगौडा म्हणाले की, ‘लोटसच्या माध्यमातून आयोजित ‘मॅथ मेला २०१९’ मध्ये यारोकीचा टोपान कंपनीच्या माध्यमातून जे गणिती शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते ते प्रशंसनीय असून विद्यार्थी आता गणितामध्ये विशेष रुची घेऊन आणखीन गणित विषयाच्या जवळ येत आहे. यारोकी गणित पद्धतीमुळे गणित शिकणे आणखी सोपे झाले असल्यामुळे विद्यार्थी मनोरंजनाच्या माध्यमातून अभ्यास करू शकतात. हे दिसून आले. दुपारच्या सत्रात टॅबलेटचा वापर यारोकीचे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून गणित कसे सोडविता येते? याचे प्रात्यक्षिक यारोकीच्या अधिकाऱ्यांनी दाखविले. यावेळी यारोकीच्या संचालिका दिपाली नागे, शिक्षांगण एज्युकेशनचे संचालक विजय गुप्ता, देविका नाडीक, रविकांत वैरागडे, अनुपमा नेरूरकर, यारोकी कन्सल्टन्सीचे ट्रेनर श्वेता आंबेकर, अनिकेत जगदाळे, अंजली सिंन्हा, दीपिका शर्मा, सौ. नाडगौडा, संस्थेचे अध्यक्ष बी.डी. रोंगे, उपाध्यक्ष एच.एम. बागल, चेअरमन डॉ. सुधाकर पडवळ, संस्थेचे संस्थापक खजिनदार दादासाहेब रोंगे यांच्यासह लोटसचे सहशिक्षक संपत लवटे, सचिन यादव, ज्ञानेश्वर वायदंडे, महेश वाघे, दादासाहेब पटेल, मयूर वागज, अर्जुन जगन्नाथ, समीर मुलाणी, अस्मिता घोलप, जान्हवी दीक्षित प्रियांका जरे, रुपाली देवकर, एन.डी. मुलाणी, सविता झांबरे आस्मा शेख यांच्यासह लोटस इंग्लिश स्कूलसह सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व गणिताचे शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचालन हृदयनाथ नामदे यांनी केले तर सागर शिंदे यांनी आभार मानले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments