पंढरपूर Live - शहरातील मंदिर परिसर हा परिचारकांच्या बालेकिल्ला समजला जातो मंदिर परिसर परिचारकांच्या विरोधात कधीही जात नाही त्यामुळे या परिसरात श्रीमंत सांगतील तेच प्रमाण चालते असे ह.भ.प.वा.ना.उत्पात यांनी सांगितले. ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारार्थ पच्शिमव्दार येथील आयोजित कॉर्नर सभेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मंदिर परिसरात कधीही जातीवाद नव्हता आणि नाही मागील प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या जाती धर्मातील उमेदवारांना या परिसरातील मतदारांनी भरघोस मते दिले आहेत यामध्ये मराठा समाजाच्या नगराध्यक्ष साधना भोसले, मुस्लिम समाजाचे नगरसेविका रेहाना बोहरी, पांडुरंग घंटी, अनिल अभंगराव हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे विरोधकांच्या कसल्याही भुलथापांवर विश्वास ठेउ नका. दरम्यान मागील पंन्नासवर्षात पंढरपूरास चारित्रसंपन्न आमदार लाभले. एक सोडून अशी टीका नाव न घेता त्यांनी भालकेंवर केली. याच्या भ्रष्टाचाराचा मी आयवीटनेस आहे. मात्र ते आता काढत नाही. त्यामुळे चारित्र्य संपन्न आमदारांच्या परंपरेच दुध नासल आहे. श्रीमंत सुधाकर परिचारक यांनी कधीही घाणेरड व जातीवाद करणार राजकारण केले नाही. त्यामुळे येत्या काळात परिचारकांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
दलित आणि बहुजन समाजातील अनेक प्रश्न सुधाकर परिचारक यांनी मार्गी लावले आहेत. तर दलित समाजावर कधीही अन्याय होउ दिला नाही. त्यामुळे दलित आणि बहुजन समाजही परिचारकांना भरघोस मतदान करणारं असल्याचे गोविंद सर्वगोड यांनी स्पष्ट केले.
यासभेसाठी नगरसेवक अनिल अभंगराव, भाजपचे दत्ता राजपूत, रा.पा. कटेकर, अॅड. प्रकाश कुलकर्णी, डॉ. प्राजक्ता बेणारे, शिवसेनेचे संजय घोडके, माजी नगरसेवक शैलेश बडवे, विजय प्रताप मंचचे दिपक वाडदेकर, याभागातील शिरीष कटेकर, रवी मुळे, शंकर महाराज बडवे, साधना भोसले, बाबासाहेब बडवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजपाचे बाबासाहेब बडवे, ह.भ.प.वा.ना. उत्पात, मदन महाराज हरिदास, अॅड. प्रकाश कुलकर्णी, नगरसेविका सुजाता बडवे, सुप्रीया डांगे, शकुंतला नडगीरे, बाबामहाजन बडवे, ॠषिकेश उत्पात, शैलेश बडवे, अर्बनचे संचालक विनायक हरिदास, सुधिर अभंगराव, शिवसेनेचे वैभव बडवे, पांडुरंग घंटी, रा.पा. कटेकर, विशाल डोके, नागेश भोसले, राजू सर्वगोड आदींसह मंदिर परिसरातील व्यापारी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments