दक्षिण काशी म्हणून ओळख असणा-या पंढरपूरचा विकास करणार : समाधान आवताडे


पंढरपूर Live - जेंव्हा नव्हते चराचर तेंव्हा होते पंढरपूर…जेंव्हा नव्हती गोदा-गंगा.. तेंव्हा होती चंद्रभागा. असा क्षेत्र महिमा असणारे पंढरपूर नगरीस भूलोकीचे वैकुंठही म्हटले जाते. देवभूमी पंढरपूर आणि संतभूमी मंगळवेढा यांचे अतूट असे नाते आहे. पंढरपूर ला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातून येथे वारकरी येथे येतात. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी मी पंढरपूरच्या विकासासाठी कटीबद्द असून पंढरपूर तीर्थक्षेत्राला महाराष्ट्राला हेवा वाटावा असा विकास करेन अशी ग्वाही पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले. ते पंढरपूर येथे शिवतीर्थावर आयोजीत प्रचारसभेत बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, पंढरपूर तिर्थक्षेत्राचा शिर्डी,शेगावच्या धर्तीवर विकास करण्यास मी कटिबध्द राहणार आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याला व नांदेडच्या गुरुव्दारासाठी ज्याप्रमाणे केंद्राकडून निधी मिळतो त्याच धर्तीवर इथेही निधी आणण्यास मी कमी पडणार नाही.  पंढरपूर शहर व तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासाठी पंढरपूरला औद्योगीक वसाहत उभी करुन रोजगार निर्मीती करणार आहे। गोपाळकाला गोड झाला म्हणत भावीक गोपाळपूरला येतात. गोपाळपूरचा विकास होणेही गरजेचे आहे. यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शासन दरबारी प्रयत्न करुन पंढरपूरला स्वतंत्र संत विद्यापीठ करणार आहे. पंढरपूर तालुक्यातील शेतक-यांच्या अनेक अडचणी आहेत. उजनी व निरा-भाटघरचे पाणी वेळेवर मिळत नाही. पाण्याच्या प्रत्येक पाळीसाठी रस्त्यावर उतरावे लागते. लोकप्रतिनिधींच्या नियोजनशुन्य कारभारामुळे जनतेवर ही वेळ आली आहे. शेतकरी बांधवांना पाण्याची आवर्तने वेळेत मिळवून देणार आहे. पुरुषांच्या खांदयाला खांदा लावून महिला भगिनी काम करतात. चांगले काम करण्याची त्यांची प्रबळ इच्छा असते, अशा महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मी कटिबध्द असणार आहे. अनेक शेतकरी बांधव पिक विम्यापासून वंचीत आहे. त्यांच्यासाठी कुणी आवाज उठविला नाही. केवळ आश्वासनाचा पाऊस पाडायचा. जनतेला भूलवत,झुलवत ठेवायचे अशाच पध्दतीचे राजकारण केले गेले आहे. ज्या वयात विश्रांतीची गरज आहे अशा वयात जनतेच्या अडचणी सोडविण्याची कुवत त्यांचेकडे आहे का हा खरा प्रश्न आहे. आज याठिकाणी पाऊसानेही माझे स्वागत केले. हा शुभशकुन समजतो. पाऊस तर पडूद्या मशागत करायला आपला ट्रॅक्टर तयार आहे. एक वेळ संधी द्या संधीचे सोने केल्याशिवाय रहाणार नाही. यामध्ये मी जर कमी पडलो तर पुढच्या वेळी तुमच्याकडे येणार नाही. बोलण्यापेक्षा काम करण्यावर माझा जास्त विश्वास आहे. यासाठीच राजकारणाची मशागत करुया आणि परिवर्तन करुया असे आवाहन उमेदवार समाधान आवताडे यांनी केले.

या प्रचार सभेला प्रचंड अशी गर्दी झाली होती. या सभेमध्ये विनोद लटके, औदुंबर शिंदे वस्ताद, डॉ.वृषाली पाटील, विठठल कारखाण्याचे मा.संचालक शेखर भोसले, दत्तात्रय जमदाडे, आदिनी मनोगत व्यक्त केले. सभेसाठी डी.सी.सी. बँकेचे व्हा.चेअरमन व जेष्ठ नेते बबनराव आवताडे,समाजकल्याण सभापती शैला शिवशरण, व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी,अंजलीताई आवताडे,संचालीका स्मिता म्हमाणे, कविता निकम,नगरसेवीका रतन पडवळे,प्रा.येताळा भगत, दत्तात्रय जमदाडे, मार्केट कमेटीचे सभापती सोमनाथ आवताडे,संभाजी ब्रिगेड,पंढरपूर शहराध्यक्ष लखन थिटे, अँड सागर आटकळे,सामाजीक कार्यकर्ते संजय[बाबा]बारसकर,मंगेश क्षिरसागर, दामाजी कारखान्याचे संचालक राजेंद्र सुरवसे,चंद्रकांत पडवळे, खंडू खंदारे,रामकृष्ण चव्हाण, बसवेश्वर पाटील, सचिन शिवशरण,संजय पवार ,तसेच दामाजी कारखान्याचे इतर संचालक मंडळ सदस्य, लक्ष्मण मस्के, बिरा कोळेकर , मंगेश क्षिरसागर, तानाजी मोरे,धनराज लटके, प्रमोद लटके, विकास मोरे, विशाल गावडे, अमोल धोत्रे, पांडूरंग करकंबकर, अमोल राऊत, आकाश नवत्रे, यांचेसह पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध सस्थांचे पदाधिकारी, सरपंच,सदस्य,सोसायटी चेअरमन,सदस्य, कार्यर्ते, पंढरपूर शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या पार पडलेल्या सभेला अलोट जनसमुदाय उपस्थित होता.
या सभेचे सुत्रसंचालन अशोक उन्हाळे,सचिन मळगे,वनिता घाडगे यांनी केले.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments