तंत्रज्ञान खेड्यापर्यंत पोहचविणे आवश्यक - नॉलेज मॅनेजमेंटचे डॉ.ए.पी. तिवारी




स्वेरीत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्त्री यांची जयंती साजरी
पंढरपूरः-तुम्ही जो अभ्यास करता नुसता वाचून चालणार नाही तर प्रत्यक्षात उतरविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी  आपण घेतलेले ज्ञान,नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती ही खेड्यापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. हे करत असताना मनुष्यामध्ये संवेदनशीलता आणि सेवाभाव असणे गरजेचे आहे. संवेदनशील असल्यावर अधिक माहिती मिळते आणि सेवाभाव असल्यास परोपकार करण्याची वृत्ती निर्माण होते. सेवाभावी वृत्तीमुळे आर्थिक फायदा काही होत नाही, परंतु त्यामुळे मनाला परमानंद मिळतो. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्हाला पुस्तकी ज्ञानापासून शेतीपर्यंत घेऊन जावी लागेल.’ असे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केंद्राच्या नॉलेज मॅनेजमेंट असोसिएट ग्रुपचे संचालक डॉ. ए. पी. तिवारी यांनी व्यक्त केले.
           गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटच्या ओपन अॅम्पी थिएटरमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांची जयंती साजरी केली.  याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणुन नॉलेज मॅनेजमेंटचे संचालक डॉ. तिवारी मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे होते. महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांच्या प्रतिमेच्या पुजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. संस्थेचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांनी आर. वर्क या सॉफ्टवेअरची माहिती दिली. प्रास्ताविकातून संस्थापक सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रोंगे यांनी संस्थेची वाटचाल सांगून महात्मा गांधीजी बॅरिस्टर असतानाचा एक प्रसंग सांगून गांधीजींची काम करण्याची पद्धत आणि त्यांच्यातील एकसूत्रीपणा यांचा आदर्श विश्वाने घेण्यासारखा असल्याचे सांगितले.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________

(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात

नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर


मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे

💯% फरक नाहीतर पैसे परत

😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट

आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत


घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999

व्हाट्स अप नंबर: 8888959582

सोलापूर प्रतिनिधी

Mallikarjun swami

8644809999 9588488845

पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178

उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर





_________________________________________________


आकृती प्रकल्पाच्या प्रमुख डॉ.स्मिता मुळे म्हणाल्या की, ‘स्वेरीत आल्यावर येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह, जोश आणि प्रत्येक कामामध्ये होत असलेला उस्फुर्त सहभाग पाहून मला माहेरी आल्याचा आनंद मिळतो. येथील कार्य करण्याची पद्धत, अभ्यासूवृत्ती यातून एक प्रकारे प्रेरणा मिळते.’ असे सांगितले. पुढे बोलताना संचालक डॉ. तिवारी म्हणाले की, ‘स्वेरी म्हणजे तंत्रज्ञान व अध्यात्मिक ज्ञान याचा सुंदर मिलाप आहे असे येथील वातावरणात जाणवते. येथील प्रत्येक शिक्षक व कर्मचारी संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरविणाऱ्या रक्त वाहिण्यासारखे काम करतात. हे सर्व डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शक्य झाले आहे. हे महाविद्यालय म्हणजे दुसऱ्यांनी अनुकरण करण्यासारखे आहे.’अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. कोरडे म्हणाले की, ‘विश्वामध्ये सहाशे विद्यापीठांमधून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा अभ्यास शिकविला जात असून त्याचे लाखो विद्यार्थी अध्ययन करत आहेत. खरच स्वेरीमधील विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि उत्कंठा यातून साजरी होणारी ही गांधी जयंती पाहून ‘खेड्याकडे चला’ असे सांगणारे महाराष्ट्रातील हे आदर्श महाविद्यालय आहे. असे वाटते. गांधी जयंतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वच्छता केली जाते परंतु आज मनाची देखील स्वच्छता करणे गरजेचे आहे.’ असेही सांगितले. यावेळी ‘स्वेरीयन’ या पाक्षिकाचे प्रकाशन करण्यात आले. गांधी व शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून घेतलेल्या वसतिगृहातील स्वतःच्या रूमची ‘स्वच्छता’, ‘निबंध’ तसेच ‘ऑलम्पस २०१९’ या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषक, स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. 


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदपंढरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना पर्यावरणयुक्त भारताची सांघिक शपथ देण्यात आली.तसेच मतदान  करण्याचा हाक्क बजावण्यासाठी देखील शपथ घेतली. यावेळी सौ. नूतन तिवारी, संस्थेचे संस्थापक जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त बी.डी. रोंगे, विश्वस्त एच.एम. बागल, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राद्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या चारही महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच अभाविपचे शुभम बंडगरश्रद्धा पावले, आंनद भुसनर, धनराज भोसले, विकास खंडागळे, स्वप्नील रोपळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.यशपाल खेडकर यांनी केले तर पारितोषक वितरणाने समारोप झाला.

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments