समाजातील चांगली माणसे पुढे आली पाहिजेत- डॉ. सचिन लादे




पंढरपूर सिंहगड मध्ये म. गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त “माझा देश माझे समर्पण” या विषावर व्याखान

 पंढरपूर (प्रतिनिधी) आजच्या समाजापुढे आदर्श व्यक्तिमत्व नसल्यामुळे समाज भरकटत चालला असून पुढच्या पिढीला आदर्श द्यायचा असेल तर स्वतःपासून चांगले वागण्यास सुरुवात करा. प्रत्येकाने हा देश माझा आहे, या देशाची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे असे वागले पाहिजे. समाजामध्ये आदर्श लोक खूप कमी आहेत, म्हणून समाज आज माझ्या एकट्याने काय फरक पडणार आहे, म्हणून चुकीच्या मार्गाने जात आहे. जर हे असेच होत राहिले तर देशाची भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होईल. म्हणून समाजातील चांगली वागणारी, आदर्श व्यक्तिमत्व असलेली माणसे पुढे आली पाहिजेत, असे मत डॉ. सचिन लादे यांनी पंढरपूर सिंहगड मध्ये बोलताना व्यक्त केले.
      कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्यसाधून “माझा देश माझे समर्पण” या विषावर डॉ. सचिन लादे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाची सुरवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, अॅकॅडमी डीन डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमित इंगोले आदी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
   
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________

(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात

नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर


मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे

💯% फरक नाहीतर पैसे परत

😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट

आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत


घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999

व्हाट्स अप नंबर: 8888959582

सोलापूर प्रतिनिधी

Mallikarjun swami

8644809999 9588488845

पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178

उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर





_________________________________________________


यावेळी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सचिन लादे यांचा पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सन्मान केला. दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी शिक्षक व विद्यार्थ्यासोबत प्लास्टिक बंदीची शपथ घेतली. यावेळी पुढे बोलताना डॉ. सचिन लादे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या हिताचे निर्णय घेतले. म्हणून ते समाजापुढे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. महाराजांनी स्वतःच्या वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून जीवाला जीव देणारी माणसं जोडली होती, म्हणून ते
स्वराज्यात सुराज्य निर्माण करू शकले. समाजासाठी जे झटले तेच आज आदर्श व्यक्तिमत्व ठरले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी त्याग केला. अशा व्यक्तीमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे कार्य सर्वसामान्यांसाठी आदर्श आहे. महापुरुषांची प्रेरणा आज विद्यार्थ्यांना मिळणे खूप गरजेचे आहे. आज समाज चांगल्या कामाला प्रतिसाद देत नसला तरी
भविष्यात देत असतो. आदर्श माणसं समाजापुढे आली तर पुढील काळात देश आदर्श बनल्याशिवाय राहणार नाही. देशासाठी चांगले काम करणारी माणसं जर पुढे आली, तर देश आदर्श होण्यास वेळ लागणार नाही. स्वतःचे समर्पण स्वतः करायचे असेल तर थोर महापुरुषांच्या आदर्श घ्या. अलीकडच्या जगात चांगल्या माणसाची खूप चेष्टा होते, पण शेवटी चांगल्याचा विजय निश्चित असतो. मी थोडासा चुकीचे वागलो किंवा माझ्या एकट्याने काय फरक पडणार आहे, असे जर प्रत्येक जण म्हणलं तर या देशाचे भवितव्य अंधारात आहे. आपण चांगला विचार करा, हा देश माझा असून मला देशासाठी काहीतरी चांगले करायचे आहे. कदाचित तुमच्या एका चांगल्या वागण्याने अनेक लोक चांगले वागतील आणि एक दिवस आपला देश आदर्श देश बनेल यात शंका नाही. असे मत डॉ. सचिन लादे यांनी व्यक्त केले.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गुरुराज इनामदार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी मानले.



_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments