विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे - प्रवेश प्रक्रीया अधिष्ठाता डॉ. प्रविण कचरे


 



तब्बल दोन हजार  विद्यार्थ्यांनी ‘किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची 
या शैक्षणिक प्रदर्शनाचा घेतला लाभ
पंढरपूर-‘विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी हुशार असूनही, स्पर्धा परीक्षेला पात्र असतानाही केवळ मार्गदर्शनाअभावी परीक्षेचे महत्व ओळखु न शकल्यामुळे ते शासकिय सेवेपासून वंचित राहतात. यामुळे सायन्स शाखेतील अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आपले भवितव्य उज्वल करण्याची संधी स्वेरीच्या किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची’ या माध्यमातून प्राप्त करुन दिली आहे. विषेशतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान व अभियात्रिकी तंत्रज्ञान विषयाचे ज्ञान फारसे अवगत नसते. यासाठी त्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाची माहीती व्हावीतसेच तंत्रविषयांमध्ये आवड निर्माण व्हावी. या हेतूने किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची’ हे तंत्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते.’ असे प्रतिपादन अभियांत्रिकी प्रवेशाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण कचरे यांनी केले.
     
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________

(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात

नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर


मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे

💯% फरक नाहीतर पैसे परत

😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट

आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत


घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999

व्हाट्स अप नंबर: 8888959582

सोलापूर प्रतिनिधी

Mallikarjun swami

8644809999 9588488845

पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178

उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर





_________________________________________________



गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची’ या विज्ञान व अभियांत्रिकी तंत्रज्ञान विषयीच्या माहितीचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील काही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भेट देवून प्रदर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पवार यांचे सलग तीन दिवस मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. तसेच ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ, प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. संतोष साळुंखे यांनीही बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या आगमनामुळे कॉलेज कॅम्पसला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या प्रदर्शनात कॉम्प्यूटरवर विविध अॅनिमेशन बनविणेछोटे इलेक्ट्रॉनिक सर्किट बनविणे, लेसर प्रिंटर व थ्रीडी प्रिंटींगद्वारे डिझाईन बनविणे आदी प्रात्यक्षिक मुलांना करुन पाहता आले. यावेळी महाविद्यालयातील संशोधनासंबंधीत प्रयोगशाळाही पहावयास मिळाले. मेकॅनिकल विभागातून रोबो रेस,लेथवार,एरो मॉडेलिंग, कास्ट स्टिल वॉरअॅटो कॅड रेसकटीया रेसटेक्नो मेक वॉरसिव्हिल विभागात फॅब्रिकाब्रीज डिझाईन,कॅड रेससर्वे हंट. इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशन विभागातून सर्कीट सुडोकोप्रात्यक्षिकरोबोट्रीक्स, कॉमन इव्हेंटसमध्ये ट्रेल ब्लेझरपिकासा, विझो-ओ-टेक, डॉक्युमेंट्री, कॅट-मॅट अॅबिलिटीकॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग विभागातून अॅनिमेशन, एन. एफ. एस., काऊंटर स्ट्राईककोड डिबगींग आदी विषयक माहिती मिळाली. यावर प्रात्यक्षिकाची माहिती देखील मिळाली. तसेच भविष्यात अभियांत्रिकीत प्रवेश घ्यायचा झाला तर लागणाऱ्या आवश्यक बाबी, त्या महाविद्यालयाच्या शैक्षणिक सुविधा, वसतिगृह व्यवस्था अशी आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना दिली. स्वेरीतील शिस्तबद्ध विद्यार्थी, संशोधनासाठी उपयुक्त वातावरण आणि मिळणारे ज्ञान यामुळे विद्यार्थी प्रचंड उत्साहीत झाले. सलग तीन दिवस चाललेल्या आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत असलेल्या या प्रदर्शनात जवळपास ३२ महाविद्यालयातील जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी व दोनशे शिक्षकांनी याचा लाभ घेतला. या भव्य व दिव्य प्रदर्शनातील मिळालेल्या माहितीमुळे शालेय विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक सुवर्ण संधी व उज्वल यश मिळणार असल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी दिली.किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची उपक्रमामुळे विद्यार्थी उत्साहीत झाल्याचे दिसून येत होते. हे तीन दिवसीय किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची प्रदर्शन स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक प्रा. संदिपराज साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडले.

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments