मंगळवेढा/- पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात वर्षानुवर्षे त्याच-त्या समस्या असून त्या समस्या सोडवण्यासाठी मला एक वेळा संधी देऊन माझ्यावर विश्वास टाकावा मी मतदारसंघाचे नंदनवन केल्याशिवाय शांत बसणार नाही असे आवाहन संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व विधानसभेचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी माचनुर येथील प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
या प्रचार सभेत दरम्यान राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष अमोल माने, बठाणचे माजी सरपंच विकास बेंद्रे, माजी चेअरमन सुब्राव बेदरे, काँग्रेस अल्पसंख्यांकचे उपाध्यक्ष मकसूद बागवान, गवडाप्पा पाटील यांनी अवताडे गटात प्रवेश करून त्यांना पाठिंबा दिला.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
काल मंगळवारी माचनूर येथील सिद्धेश्वर मंदिरात देवाला श्रीफळ फोडून या प्रचाराचा शुभारंभ झाला यावेळी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. पुढे बोलताना आवताडे म्हणाले की या मतदार संघातील जनता पाणी, विज ,रस्ते या प्रमुख समस्यांनीच ग्रासली असून या समस्या सोडविण्यासाठी मतदार संघाला कोणी वालीच नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे, माझ्या समोरच्या उमेदवारांचा वयाचा मला आदर आहे या वयात ते कामे कशी करणार याचा विचार मतदारांनी केला पाहिजे,उजनी धरण 100 टक्के भरूनही नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यांना व्यवस्थित पाणी मिळाले नाही, लोकप्रतिनिधींचे नियोजन हे नियोजनशून्य असल्यामुळे अनेक कामे मार्गी लागली नाहीत त्यामुळे जनतेने या वेळी विचार करायला हवा.
सध्या माझ्या ताब्यात असलेला व तालुक्यात शेतकऱ्यांचे मंदिर म्हणून संबोधला जाणारा दामाजी कारखाना मी मंदिराप्रमाणेच जपत शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज करत उसाला घामाचे दाम मिळवून दिले आहे ,संचालक मंडळ वाचनपूर्ती करण्याचे काम करत आहे ,बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे माझ्या कारभाराची चुणूक कारखान्याच्या माध्यमातून या तालुक्यातील जनतेने पाहिली असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला एक वेळ संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले
या प्रचार समारंभानंतर त्यांनी माचणूर,ब्रह्मपुरी ,मुंडेवाडी, रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर ,सिद्धापूर या गावातही प्रचार दौरा करून मतदारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख येताना भागात, दत्तात्रय जमदाडे शेतकरी संघटनेचे सुरेश पवार, शेखर भोसले, डाॅ.वृषाली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
यावेळी...... पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर दामाजी कारखान्याचे चेअरमन अंबादास कुलकर्णी, दामाजी देवस्थानचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, समाज कल्याण सभापती शीलाताई शिवशरण, जिल्हा परिषद सदस्य दिलीप चव्हाण, मंजुळा कोळेकर संचालक दामाजी शुगर राजेंद्र पाटील,लक्ष्मण जगताप, शिवयोगीप्पा पुजारी, बाळासाहेब शिंदे, राजू बाबर ,विजय माने, ॲड.डी.सी जाधव, ॲड.दत्तात्रय तोडकरी, विजय पाटील मा.सरपंच, चंद्रकांत पडवळे,सुधाकर मासाळ ,लक्ष्मण मस्के ,नवनाथ आबा पवार, सतीश मोहिते, गोपाळ पवार ,शिवाजी पटाप, विनोद लटके, प्रकाश पवार, विजयसिंह पाटील, औदुंबर शिंदे वस्ताद, मोहनआप्पा बागल, सुधाकर फटे, शांतिनाथ बागल, प्रकाश बाबर, अशोक देशमुख, सतीश मोहिते, तुकारामे कुरे, गणेश गावकरे, खंडू खंदारे, परमेश्वर येनपे ,विराप्पा पुजारी ,अवधूसिद्ध पुजारी, बळी शिनगारे, सरोज काझी, केराप्पा मळगे, सिद्धेश्वर गायकवाड, सुब्राव बेदरे ,मुरलीधर पुजारी ,दत्तात्रय पुजारी, आनंदराव पाटील, बजरंग पवार, सतीश पाटील, लाडिक डोके यांचेसह विविध गावचे सरपंच सोसायटी चेअरमन, सदस्य यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर यादव व अशोक उन्हाळे यांनी केले
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________







0 Comments