मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं ‘बलस्थान’ मिसेस मुख्यमंत्री ‘रश्मी ठाकरे’



पंढरपूर Live : 
सार्वजनिक कार्यक्रमात उद्धव ठाकरेंची पत्नी आणि आदित्यची आई म्हणून अत्यंत ‘लो प्रोफाईल’ पण ‘ग्रेसफुल’ अशी त्यांची उपस्थिती असते. पण पडद्यामागे त्या शिवसेनेच्या अत्यंत सक्रिय अशा कार्यकर्त्या आहेत. मातोश्रीवर आल्यागेल्या पै पाहुण्याचं आगतस्वागत, त्या माँसाहेबांसारख्याच उत्तम सुगरण आहेत. शिवसैनिकांशी विशेषतः शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांशी सातत्यानं संवाद आणि उत्तम सामाजिक आणि राजकीय नेटवर्क असल्यानं राजकीय, सामाजिक अंडरकरंटस रश्मी वहिनींपर्यंत कायम पोहोचत असतात.
मुळच्या डोंबिवलीच्या असलेल्या पाटणकर (रश्मीताई) यांची महाविद्यालयीन काळात उध्दव ठाकरे यांची भेट झाली. दोघेही जे. जे. आर्ट स्कूलचे विद्यार्थी. तिथेच त्यांचे प्रेम जुळले आणि विवाहही झाला. पाटणकरांच्या ठाकरे झाल्यावर रश्मीताई यांनी सुरुवातीच्या काळात "मातोश्री" ची अथार्र्त सासरे बाळासाहेब ठाकरे यांची कार्यपध्दती समजून घेतली. आणि त्याप्रमाणे शांतपणे पावले उचलत नवर्‍याच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहण्यास सुरुवात केली. आता त्यांच्याकडे केवळ "मिसेस मुख्यमंत्री" म्हणुनच नव्हे तर एका आमदाराच्या मातोश्री म्हणुनही पाहिले जात आहे.

रश्मी ठाकरेंचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यापर्यंत आलेल्या प्रत्येक तक्रारीची, माहितीची त्या शहानिशा करतात. विशेष म्हणजे रश्मी ठाकरेंचा जेवढा तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संपर्क असतो तेवढाच त्यांचा मुंबईतल्या उच्चभ्रूंच्या पेज थ्री सर्कलमध्येही वावर असतो. त्यामुळे सगळ्या स्तरातल्या खबरी रश्मी वहिनींपर्यंत अचूक पोहोचतात.

मुळात रश्मी ठाकरेंचा राजकीय सेन्स अत्यंत चांगला आहे. उद्धव ठाकरेंकडेच शिवसेनेची कमान देण्यासाठी बाळासाहेबांना राजी करण्यात रश्मी ठाकरेंची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती, असं म्हणतात. त्यानंतर राज यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे अत्यंत अस्वस्थ होते, त्यावेळी त्यांना भक्कम आधार देण्यात रश्मी ठाकरेंची महत्त्वाची भूमिका होती. उद्धव ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीत विशेषतः बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना सांभाळण्यात उद्धव ठाकरे यांना भक्कम साथ देणारा शिवसैनिक म्हणजे रश्मी ठाकरे. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री झाले आहेत. प्रत्येक शिवसैनिकासाठी हा आनंदाचा क्षण. पण सर्वोच्च आनंद झाला असेल तो ठाकरेंच्या या सरकारला.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments