हैदराबादच्या प्रियांकाची निर्घृण हत्या अन् दिल्लीच्या निर्भयाची आठवण! चौघे नराधम ताब्यात

पंढरपूर Live : तेलंगणाच्या राजधानीजवळील शादनगर गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अज्ञात लोकांनी वेटरनरी डॉक्टर प्रियांका यांच्यावर अमानुष अत्याचार करत सामुहिक बलात्कार करून पेटवून ठार मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे दिल्लीच्या निर्भयाची आठवण ताजी झाली. प्रियांका रेड्डी यांच्या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. ट्रकचालकासह त्याच्या क्लिनर्सनेही प्रियांकावर बलात्कार करुन तिची हत्या केली.

 शादनगर गावाजवळील चट्टानपल्ली पुलावर पोलिसांना प्रियंका रेड्डीचा जळलेला मृतदेह सापडला आहे.
बुधवारी प्रियांका ह्या आपल्या शालेनगर येथील घरून कल्लूरु गावच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात ड्युटीसाठी गेल्या होत्या. संध्याकाळी घरी परत असताना प्रियांका यांची दुचाकी बिघडली. याबाबत त्यांनी आपल्या बहिणीला फोन करून सांगितले. यावेळी प्रियांका यांनी खूप भीती वाटत असल्याचेही सांगितले.त्यानंतर काही अज्ञातांनी प्रियांका यांना मदत करण्याची तयारी दाखवली.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
 डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर बलात्कार करून जाळून मारण्यात आले. तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर आता त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवालही आला असून, त्यांच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

माणसातील विकृत सैतानांचे अमानुष दुष्कृत्य...
आरोपींची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोंपीपैकी तीन आरोपी हे 20 वर्षांचे आहेत तर एकाचं वय हे 26 आहे. हे चारही आरोपी तेलंगणामधले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी चारही आरोपींनी पीडित तरुणीला टोल प्लाजावर स्कुटी उभी करत असल्याचे पहिले होते. यानंतर आरोपींनी सामूहिक बलात्काराचा कट रचत तिची स्कुटी पंक्चर केली. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपली स्कुटी घेण्यासाठी परतली असता पंक्चर झाली असल्याचे तिच्या लक्षात आले.

यावेळी एक आरोपी मदत करण्याचा बहाण्याने तेथे पोहोचला. त्याचा हेल्पर स्कुटी दुरुस्त करुन देतो सांगत निर्जनस्थळी घेऊन गेला. यावेळी पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आरोपींनी तिचा आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये यासाठी पीडित तरुणीचे तोंड दाबून ठेवले. यावेळी श्वास घेऊ न शकल्याने पीडितेचा गुदमरुन मृत्यू झाला.
त्यानंतर आरोपींनी पीडितेचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केले. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला.

प्रियांका रेड्डीचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो समोर आल्याने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली. प्रियांका रेड्डीला जवळपास 7 तास बांधून ठेवण्यात आले होते.

बुधवारी रात्री साडेनऊपासून गुरुवारी पहाटे 4 पर्यंत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तसेच या चौघांनी प्रियांकाचा मानसिक, शारीरिक त्रासही दिला, असे या अहवालात म्हटले आहे. 

हे  आहेत ते 4 नराधम...
ये है डॉ. प्रियंका के हत्यारे दरिन्दे। इन चारों दरिन्दों अहमद पाशा, चेन्ना केशव, शिवा जोल्लु, और नवीनकुमार को चौराहे पर ज़िंदा जला दो।

RIPPriyanka Reddy Justice For Priyanka
अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मिडीयावर व्यक्त होत आहेत.

सोशल मिडीयावर तीव्र संताप आणि निषेध 
प्रियांकाच्या हत्येनंतर #RIPPriyankaReddy #drpriyankareddy #JusticeForPriyanka हा ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला असून देशभरातील असंख्य ट्विटर वापरणाऱ्यांनी या घटनेबद्दल खेद आणि आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. काहींनी आरोपीला डॉक्टर तरुणीला जाळून मारले त्याप्रमाणे सर्व लोकांसमोर आरोपींना जाळून मारा. तर काहींनी आरोपींना फासावर चढवा असा संतप्त प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. भिवंडीचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच अभिनेत्री पायल रोहतगी हिने देखील एक ट्विट केले असून त्यात तिने म्हटले आहे की, 'मुस्लिम बहुल भागात हिंदू तरुणीला बलात्कार करून जाळून मारण्यात आले. देशातील माध्यमांनी ही बातमी प्रकर्षाने दाखवावी आणि प्रियांकाला न्याय मिळवून द्यावा. तसेच देशभरातून अनेक प्रतिक्रिया या अंगावर शहारा आणणाऱ्या घटनेनंतर उमटू लागल्या आहेत.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments