Pandharpur Live - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. २० वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री असतील.
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुक नेते स्टॅलिन आदी नेत्यांना शिवसेनेने निमंत्रित केले आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले.
सोनिया गांधी यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता असून, अहमद पटेल व अन्य राष्ट्रीय नेते शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहतील. दीड वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये बिगरभाजप काँग्रेस-जनता दल संयुक्त सरकारच्या शपथविधीसाठी सोनिया यांच्यासह मायावती आणि अन्य राष्ट्रीय नेते उपस्थित होते. याच धर्तीवर शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या या समारंभाला राष्ट्रीय नेत्यांनी उपस्थित राहावे, असे शिवसेनेचे प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे शपथ घेणार आहेत.
शिवतीर्थावर सहा हजार चौ.फू. स्टेज, 60 हजार खुर्च्या, 20 एलईडी
शिवाजी पार्कमध्ये सहा हजार चौरस फुटांवर भव्य व्यासपीठ उभारले जात आहे. मंचावर शंभर जणांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली जाईल. शपथविधीचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी 60 हजार खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे.
शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह टेलिकास्ट पाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये कानाकोपऱ्यात 20 एलईडी लावले जाणार आहेत.
उध्दव ठाकरे यांनी दिला 'सामना' च्या संपादक पदाचा राजीनामा
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे 'सामना'चे संपादकपद उद्धव ठाकरेंनी सोडले आहे. 'सामना'ची जबाबदारी कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊतांकडे सोपवण्यात आलीय. त्यामुळे आजचा 'सामना' प्रथमच ठाकरेविरहीत 'सामना' आहे. वृत्तपत्र नियमन कायद्यानुसार वृत्तपत्रातील मजकूराची जबाबदारी संपादकाची असते. त्यानुसार प्रत्येक वृत्तपत्राला आपल्या संपादकाचे नाव वृत्तपत्रात छापणे बंधनकारक आहे.
कालपर्यंत 'सामना'च्या मजकूराची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर होती. आज मात्र सामनाच्या वृत्तपत्र नियमन कायद्यानुसार ही जबाबदारी आता संजय राऊत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवसेनाप्रणीत महाविकासआघाडीचे सरकार आज स्थापन होत आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments