पंढरपूर नगरपरिषदेची कार्तिकी यात्रेसाठी यंत्रणा सज्ज
अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.८ नोव्हेंबर २०१९ रोजी कार्तिकी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना सुविधा पुरविण्याकामी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झाली असुन यात्रेकरुंना यात्रा कालावधीमध्ये खालीलप्रमाणे सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.
सध्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने शहरात रस्त्यांवर पडलेले खड्डे नगरपरिषदेने प्रदक्षिणा रस्त्याचे व शहरातील रस्ता दुरुस्तीची कामे यात्रेपुर्वी करण्यात आली आहेत. तसेच स्टेशन रोड, अर्बन बँक ते नाथ चौक, सावरकर पुतळा ते महाद्वार, मंदिर परिसर,प्रदक्षिणा मार्ग,अंबाबाई पटांगण, चंद्रभागा वाळवंट तसेच संपुर्ण शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली असुन अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस प्रशासन व नगरपरिषद कर्मचा-यांची विशेष पथकाची निर्मीती करण्यात आली आहे. त्या पथकामार्फत अतिक्रमण काढण्याचे काम युद्धपातळीवर काम चालु आहे. सध्या नदी पात्रात पाणी असल्याने प्रत्येक घाटासमोर असलेल्या लोखंडी पोलवर मोठ्या प्रमाणात मेटल हायमास्ट दिवे लावण्यात आले असुन सदर दिव्यांचा प्रकाश संपुर्ण घाटावर व वाळवंटात पडणार आहे. त्याचप्रमाणे यात्रेकरुंच्या सोईसाठी संपुर्ण दर्शन बारी मार्ग, ६५ एकर मध्ये, वाखरी तळावर मेटल हायमास्ट, सोडियम व्हेपर दिवे बसविण्यात आले आहे. तसेच वाळवंटात विशेष स्वच्छता रहावी म्हणुन पंढरपूर नगरपरिषद कर्मचा-यांमार्फत दररोज स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच वाळवंटात उघड्यावर शौचास बसु नये म्हणुन विशेष टीम नेमण्यात आली आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

तसेच आर.एस.डी.एफ. चे ३२ जवान ४ बोटीसह प्रत्येक घाटावर भाविकांचे जिवरक्षक म्हणुन काम पाहणार आहेत. तसेच नदी पात्र, पत्राशेड, ६५ एकर, मनिषा नगर, मंदिर परिसर दक्षिण बाजु येथे आगीची दुर्घटना होवु नये म्हणुन २४ तास अग्निशमन वाहन उभे करण्यात आले आहेत. पत्रा शेड, नविन अग्निशमन केंद्र, चंद्रभागा नदी वाळवंट तसेच मंदीरा भोवती आग लागल्यास अग्निशामकाला त्वरीत पाणी उपलब्ध व्हावे म्हणुन मंदीराच्या दक्षिण बाजुस फायर हायड्रेट उभा केला आहे. शहर व मंदीर परिसरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गोपाळपुर नाका येथील पत्रा शेडमध्ये पिण्याचे पाणी नळ कनेक्शन द्वारे उपलब्ध करुन दिले आहे. शहरात एकुण ६५ हातपंप व १३० विद्युत पंप उपलब्ध असुन याद्वारे यात्रेकरुंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रा कालावधीत संपुर्ण शहरात विशेष: ज्या ठिकाणी मठांची संख्या जास्त आहे त्याठिकाणी पाणी पुरविण्यासाठी पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत पुर्वी शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली असुन यात्रा कालावधीमध्ये शहरात स्वच्छता रहावी म्हणुन नियोजन बद्ध कार्यक्रम आखण्यात आला असुन नगरपरिषदेच्यावतीने १२०० सफाई कर्मचा-यांद्वारे शहरात व उपनगरात स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच यात्रा कालावधीमध्ये प्रत्येक मोठ्या मठांमध्ये स्वतंत्ररित्या कचरा साठविण्यासाठी लोखंडी बॅरेल ठेवावेत अशी सुचना मठाधीपतींना देण्यात आलेली आहे. तसेच ५५ घंटागाडी द्वारे दिवसा व रात्री २४ तास कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत चालु राहणार आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील ८ वाहने, २ कॉम्पॅक्टर, ३ डंपरप्लेसर, २ डंपिंग ट्रॉलिने ९० कंटेनर व इतर टॅँक्टर व टिपर १२ वाहनामार्फत दररोज १०० ते १२० टन कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे.व मठामधील कचरा रात्री संकलित करण्यात येणारा आहे
तसेच ६५ एकर, वाखरी पालखीतळ ,पत्राशेड व शहरातील विविध ठिकाणी कायमस्वरूपी ४१५० शौचालय असुन तात्पुरते ५०० शौचालये बसविण्यात आले आहेत.उघड्यावर शौचालये बसु नये म्हणुन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
तसेच शहरातील न.पा.चे बोअर मठातील विहीरी, आडामध्ये मदर सोल्युशन टाकुन क्लोरीनेशन करण्यात आले आहे. शहरात यात्रा कालावधीमध्ये पत्राशेड दर्शनबारी, पोलीस संकुल, दर्शन मंडप, ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट या ५ ठिकाणी यात्रेकरुंच्या सोईसाठी प्रथमोपचार केंद्र उघडण्यात आले आहे. तसेच यात्रा कालाधीत कॉलरा हॉस्पिटल येथे ५० कॉटचे हंगामी स्वरुपाचे संसर्गजन्य रुग्णालय स्थापित करण्यात आले आहे. शहरामध्ये प्रथमोपचार केंद्रावर १५ वैद्यकीय अधिकारी, २० परिचारीका, कर्मचारी काम पाहतील. तसेच १०८ च्या अॅम्बुलन्स २४ तास कार्यरत राहणार आहे. तसेच यात्रा कालाधीमध्ये संपुर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष पंढरपूर नगरपरिषद मुख्य कार्यालय येथे उघडण्यात आले आहे. त्याचा दुरध्वनी क्र.२२३२५३ असा आहे. नगरपरिषद टोल फ्री नंबर १८००२३३१९२३ आहे. यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणुन नगरपरिषदेचे नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, उपनगराध्यक्षा लतिका डोके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पक्षनेते, सर्व सभापती व नगरसेवक, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील राहणार आहेत. तसेच यात्रा कालावधीमध्ये शहरातील सर्व स्थानिक नागरीकांनी स्वच्छता व आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी सहकार्य करावे असे अवाहन करण्यात आले आहे.
_________________________________________________

0 Comments