पंढरपूर:-04: कार्तिकी यात्रेनिमित्त शहरात वाहतुक कोंडी होवू नये म्हणून पंढरपूर शहरातील तसेच शहरा बाहेरील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला असून,हा बदल 12 नोव्हेंबर 2019 पर्यंत राहणार आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना सूचना:- पंढरपूरात यात्रे निमित्त नगर,बार्शी,सोलापूर,मोहोळ कडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड , (अहिल्यादेवी चौक) शेटफळ चौक मार्ग विसावा येथे पार्क करावीत. 65 एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्क करावीत. पुणे,सातारा,वाखरी, मार्गे येणारी वाहने इसबावी विसावा, गाताडे प्लॉट व कॉलेज क्रॉस रोड चौकीच्या पाठीमागील मैदानात पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर,सांगली,मिरज,सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे येवून टाकळी हायस्कुल मैदान व वेअर हाउस येथे पार्क करावीत. तसेच विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने टाकळी मार्गे वेअर हाऊस व यमाई तुकाई मंदीर येथे पार्कींग करावीत.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

पंढरपूर शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांबाबत सूचना:-पंढरपूर शहरातून टेंभुर्णी, नगर, सोलापूर, लातूरकडे जाणा-या सर्व वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड,करकंब मार्गे जातील. पुणे-साता-याकडे जाणारी वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका, वाखरी मार्गे जातील तर विजापूर,कराड,आटपाडी,कोल्हापूर, सांगली,मिरज,मंगळवेढा मार्गे जाणा-या सर्व गाड्या सावरकर चौक,गादेगांव फाट्या पासून जातील.
पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबबात:- दि.12 नोव्हेंबर पर्यंत प्रदक्षिणा मार्ग, महाव्दार चौक ते शिवाजी चौक, सावरकर चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. बार्शी, सोलापूर मार्गावरुन येणारी हलकी वाहने तीन रस्ता, अहिल्या देवी चौक, नवीन पुला मार्गे नगरपालीकेच्या वाहनतळावर जातील. नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणा-या एस.टी. बसेसना जुना दगडी पुल व तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक या मार्गाने येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे.अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, सावरकर चौक ते अर्बन बँक, लहुजी वस्ताद चौक ते काळा मारुती चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनासांठी बंद ठेवण्यात येणार आहे.
_________________________________________________
_________________________________________________
पार्किंग व्यवस्था सूचना :-नगर,बार्शी,सोलापूर,मो होळ कडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड, तीन रस्ता मार्गे विसावा व नगरपालिकेच्या वाहनतळावर पार्किग करतील.पुणे,सातारा,वाखरी,मार्गे येणारी वाहने इसबावी, विसावा तसेच कॉलेज क्रॉस रोड चौकीच्या पाठीमागील मैदानात पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी मार्गे येवून टाकळी हायस्कुल मैदान व वेअर हाउस येथे पार्क करावीत. विजापूर, मंगळवेढाकडून येणारी वाहने अनवली फाटा, कासेगाव कासेगाव फाटा टाकळी मार्गे वेअर हाऊस व यमाई तुकाई मंदीर तसेच बिडारी बंगला सेशन कोर्टाशेजारी पार्कींग करावीत. यात्रा कालावधीत शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण, गजानन महाराज मठ, नगरपालिका पार्कींग, क्रीडा संकुल, सखुबाई पार्कींग तसेच संबधीत मठामध्ये पार्क होतील इतर वाहने जुना कराड नाक्यासमोरील रेल्वे मैदान व मार्केट यार्ड येथे पार्क करतील. शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाड्या पार्क करण्यास मनाई असेल.
एकेरी मार्ग:- कॉलेज क्रॉस रोड ते सरगम चौक ते सावरकर चौक ते नवीन कराड नाका यामार्गावर एकेरी वाहतुक राहील.
शहराबाहेरुनजाणाऱ्या वाहतुकीबाबत सूचना:- सोलापूर, बार्शी, नगर बाजुकडून नियमीतपणे पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरुन वेळापूर, अकलूज, महुद, सांगोला, मंगळवेढा बाजुकडे जाणारी जड व अवजड वाहनांना शिवाजी चौक, शेटफळ फाटा, वेणेगाव फाटा,अहिल्या चौक येथून पंढरपूर मार्गे जाण्यास प्रवेश बंदी आहे. ही वाहने मोहोळ, कामती, मंगळवेढा, सांगोला किंवा शेटफळ, टेभुर्णी, वेळापूर, साळमुख फाटा, महुद, सांगोला या पर्यायी मार्गाने जातील.
विजापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, आटपाडी, पुणे बाजुकडून नियमितपणे येवून पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरुन टेंभुर्णी, शेटफळ, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला कडे जाणारी जड व अवजड वाहने, गॅस सिलेंडर, केरोसीन, डिझेल, पेट्रोल, शासकीय अन्न-धान्य वाहतुक करणारी वाहने वगळण्यात आली आहेत. कुरुल फाटा, मंगळवेढा नाका, सांगोला नाका, महुद फाटा, साळमुख फाटा, वेळापूर येथून पंढरपूर मार्गे जाण्यास बंदी आहे. ही वाहने कामती, मंगळवेढा, सांगोला, महुद, वेळापूर, अकलूज, टेंभुर्णी या पर्यायी मार्गे जातील.
संबधित भाविकांनी व वाहनधारकांनी या बदलेल्या वाहतुक मार्गाची नोंद घेऊन वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे आवाहन वाहतुक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments