पंढरीत डेंग्यु सदृश्य आजाराचे थैमान.. डेंग्यु सदृश्य आजाराने इसबावीतील मुलाचा मृत्यु! झोपाळु नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष


Pandharpur Live -  पंढरपूर शहर व उपनगरांमध्ये सध्या डेंग्यु सदृश्य आजाराने थैमान घातले असुन काल रात्री डेंग्यु सदृश्य आजारामुळे इसबावी येथील दुध डेअरी समोरच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या चि. श्रीनाथ कालिदास आटकळे (मुळ गाव- शेगाव दुमाला, ता.पंढरपूर) या मुलाचा डेंग्य सदृश्य आजाराने मृत्यु झाला आहे. श्रीनाथवर खाजगी रुग्णालयात उपचार चालु होते. परंतु उपचारादरम्यानच त्याची प्राणज्योत मालवली. श्रीनाथ च्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर नागरिकांमधुन संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी- बंडु अटकळे 

 माझ्या पुतण्याचा मृत्यु डेंग्यु सदृश्य आजाराने झाला आहे. पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. अशी भावनीक पोष्ट श्रीनाथ चे काका बंडु अटकळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केली आहे. त्यांच्या या पोष्टवरुन नागरिकांनी प्रशासनाच्या उपाययोजनावर अवलंबुन न राहता आपली काळजी आपणच घ्यावी. अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे.
झोपाळु नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
पावसाळा संपल्यानंतर पंढरपूर शहर व उपनगरांमध्ये सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. उपनगरांमध्ये तर नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी फिरकतही नाहीत. अनेक ठिकाणी साठलेले पावसाचे पाणी, दलदल जशीच्या तशी आहे. डेंग्यु सदृश्य आजार पसरविणार्‍या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. वारीनंतर तर पंढरीतील अस्वच्छतेमध्ये अधिकच भर पडलेली जाणवतेय.  पंढरीतील विविध उपनगरांमध्ये डेंग्यु सदृश्य आजाराने अनेकजण त्रस्त आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. पंढरपूर नगरपरिषदेच्या प्रशासनाने आत्ता तरी आपला झोपाळुपणा सोडून यावर तात्काळ उपाययोजना करुन शहरातील स्वच्छतेकडे लक्ष घालावे. अशी अपेक्षा नागरिकांमधुन व्यक्त होत आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments