पंढरपूर Live : काळ आणि आयुष्य यांचा संगम साधणारा माणूस कर्तृत्ववान होतो – डॉ. द. ता. भोसले
पंढरपूर – “अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि लेखन या सर्वांचा समाजासाठी वापर करण्याची वृत्ती ही आदर्श शिक्षकांमध्ये असते. चांगला शिक्षक हा मुलांचा शिक्षक, पालकांचा मार्गदर्शक व मूल्यांचा उपासक असतो. असेच शिक्षक राष्ट्र उभारणीत मोलाची भर टाकतात. माणसांला मिळालेले आयुष्य हे मर्यादित असते. त्यामुळे काळाचा अपव्यय न करता योग्य नियोजन करणे आवश्यक असते. म्हणून आयुष्यातील काळाचा योग्य तो वापर करुन यश संपादन केल्याने कर्तृत्त्ववान बनता येते.” असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता भोसले यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या समाजमानव्यविज्ञान विभागाच्या अधिष्ठातापदी डॉ. विकास कदम यांची नुकतीच निवड झाल्याने त्यांच्या शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य डॉ. राजेंद्र जाधव, उपप्राचार्य बी. जे. तोडकरी आदी मान्यवर उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा............................................
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
डॉ. द. ता. भोसले पुढे म्हणाले की, “डॉ. विकास कदम हे व्यासंगी व अभ्यासपूर्ण शिक्षक आहेत. त्यांनी केलेले संशोधन हे विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे विभागात उपयुक्त ठरणारे आहे. त्यांनी अध्यापनाबरोबरच केलेले संशोधन मोलाचे ठरणारे आहे. धनाची आसक्ती, सत्तेचा हव्यास, कामवासनेची तृप्ती, सुख मिळविण्याची आसक्ती व प्रसिध्दीची हाव या पाच गोष्टींना जन्मत:च अतृप्तीचा शाप आहे. त्यामुळे या क्षणिक सुखामध्ये गुंतून न पडता अध्ययन, अध्यापन, संशोधन याचा व्यासंग माणसाला यश, कीर्ती व अधिकार प्राप्त करुन देतो.”
या कार्यक्रमात डॉ. विकास कदम व सौ. सुवर्णा कदम या उभयतांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना डॉ. कदम म्हणाले की, “मी एकतीस वर्ष या महाविद्यालयात इमाने इतबारे सेवा केली. संशोधनाच्या क्षेत्रात केलेल्या कार्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचा फार मोठा वाटा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील व कर्मवीर जगदाळे मामा यांनी केलेल्या कार्यामुळे मला शिक्षन घेता आले आणि जीवनात हे यश संपादन करता आले. आजवर लाभलेल्या तेरा प्राचार्यांनी मला मदत केल्यानेच रयत शिक्षण संस्थेअंतर्गत विविध समित्यावर काम करता आले. मला मिळालेल्या या संधीमुळे मी कृतार्थ आहे.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, “सेवकांच्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे महाविद्यालयाची उंची वाढत असते. माणसाला जेंव्हा एखादी संधी नाकारली जाते. तेंव्हा त्याला संधीची इतर दारे खुली होतात. शैक्षणिक गुणवत्ता ही अनेक संधी निर्माण करत असतात. विकास कदम हे आपल्या कार्य कर्तृत्वाने विद्यापीठाच्या नावलौकिकात निश्चित भर टाकतील.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत डॉ. हनमंत लोंढे यांनी केले. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे, डॉ. सुखदेव शिंदे व प्रोफेसर डॉ. सुरेश पाटील आदींनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त कली. या कार्यक्रमास माजी रयत सेवक वाय. एन. माने, एम. बी. वायकर, प्रोफेसर डॉ. तानाजी लोखंडे, उपप्राचार्य डॉ. निंबराज तंटक, सिनिअर, ज्युनिअर व व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र पवार यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. प्रशांत नलवडे यांनी मानले.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
8149624977
_________________________________________________
_________________________________________________
0 Comments