महाराष्ट्र - सत्तास्थापनेच्या गोंधळातील अजित पवारांच्या कालच्या धक्क्यानंतर सावरतेय राष्ट्रवादी


Pandharpur Live - महाराष्ट्रात पुन्हा एकदा काका पुतण्यामधील राजकीय मतभेद चव्हाट्यावर आले होते. परंतु शरद पवार व सुप्रियाताई सुळे यांनी शिताफीने व धीराने सर्व परिस्थिती हाताळल्याने आता राष्ट्रवादी व पवार कुटुंबीय कालच्या धक्क्यानंतर सावरतेय असं चित्र आहे. 

 अजित पवारांच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. तर अनेक कार्यकर्त्यांनी पुण्यासह बारामतीत शरद पवारांच्या समर्थनार्थ चौकात 'आम्ही, ८० वर्षाच्या योद्ध्यासोबत' अशा आशयाचे होर्डिंग्ज लावत पाठिंबा दर्शवला.

मात्र अवघ्या काही तासांमध्ये बारामतीतलं हे पोस्टर आता हटवण्यात आलेलं आहे. बारामती हा शरद पवारांचा गड मानला जातो. गेली अनेक वर्ष महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात शरद पवारांनी बारामतीमधल्या विकासकार्याच्या माध्यमातून स्वतःचं दबदबा निर्माण केला आहे. मात्र त्याच शहरात आता शरद पवारांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले पोस्टर्स उतरवण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. दरम्यान पवार घराण्यात कोणताही वाद नको, यासाठी हे पोस्टर हटवण्यात आल्याचं उपस्थित नागरिकांनी सांगितलं. 

या सर्व प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवारांची विधीमंडळ नेते पदावरुन हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी एक आठवड्याच्या कालावधी दिला आहे. त्यामुळे या काळात राज्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

एकुणच महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या गोंधळातील अजित पवारांच्या कालच्या धक्क्यानंतर राष्ट्रवादी व पवार कुटुबीय  आता सावरतेय. 

अजित पवारांचा राजकिय प्रवास
१९९१ साली सर्वात प्रथम बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांना शरद पवारांनी केंद्रीय राजकारणाचे दरवाजे खुले केले. शरद पवार मुख्यमंत्री असताना राजीव गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची जबाबदारी सर्वस्वी त्यांच्यावर सोपवली होती. राजकारणातील ज्येष्ठता संपुष्टात येऊन काँग्रेसचे धोतर इतिहासजमा करून सुटाबुटातले चेहरे राजीव गांधींनी आणले होते. त्यातील एक तरुण, पण मराठी रांगडा चेहरा अजित पवार. शरद पवारांची महाराष्ट्रावर पकड असल्यामुळे शरद पवारांच्या नावावरच लोकसभेवर निवडून आलेले अजित पवार अर्थातच कायम शरद पवारांच्या पावलावरून चालू लागले. नंतर शरद पवार जेव्हा नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून गेले तेव्हा त्यांनी अजित पवारांना राजीनामा द्यायला लावून पुन्हा पोटनिवडणुकीद्वारे लोकसभेवर गेले आणि त्यानंतर अजित पवार १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग सहा वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.

राष्ट्रवादी च्या  54 पैकी 53 आमदार परत शरद पवारांकडे

 - दिग्विजयसिंह 

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 आमदारांपैकी 53 आमदार शरद पवारांकडे परत आले आहेत. त्यामुळे अजित पवार आता एकटे पडतील. तसेच शरद पवारांच्या उत्तराधिकाऱ्यांचा प्रश्नही निकाली लागला आहे. अभिनंदन सुप्रिया सुळे जी, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते दिग्वीजय सिंह यांनी व्यक्त केलंय. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण यावरुन खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये वाद होता.

अजित पवारांच्या बंडामुळे याला पूर्णविराम मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर दिग्वीजय सिंह यांचे ट्विट महत्त्वाचं आहे. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने नव्याने स्थापन झालेल्या सरकारला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments