पंढरपूर Live : भाजपसमोर सध्या बंडखोरीचे मोठे संकट असल्याचे सांगितले जात आहे. तसेच हे बंडखोर सध्या एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांच्या संपर्कात असून वेगळा विचार करण्यासाठी या नेत्यांवर दबाव टाकत असल्याचे समजते. त्यातच पंकजा मुंडे यांच्याविषयीच्या चर्चेनंतर या नेत्यांकडूनही हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात पराभूत झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत नाराजी नाट्य उफाळून आले आहे. फेसबुक पोस्ट लिहून आपल्या समर्थकांना भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सूचक संदेश दिल्यानंतर त्या भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण एकट्या पंकजा मुंडेच नाही तर राज्यातील भाजपचे अनेक दिग्गज नेते बंडाचा झेंडा हाती घेणार की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.
भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेतृत्व दिले होते. देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच भाजपचा संपूर्ण प्रचार फिरत राहिला. त्यातच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे मुक्ताईनगरमधून, विनोद तावडे यांचे बोरिवलीतून, प्रकाश मेहता यांचे घाटकोपरमधून आणि चंद्रशेखर बावनकुळे अशा दिग्गज नेत्यांचे तिकीट कापण्यात आल्यामुळे हे नेते आधीच राज्यातील भाजप नेतृत्वावर नाराज आहेत.
नुकताच एकनाथ खडसे यांनी रोहिनी खडसे आणि पंकजा मुंडे या पडल्या नाहीत तर त्यांना पाडण्यात आल्याचा आरोप केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांचा रोख होता का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर आगामी काळात पक्ष नेतृत्व आम्हाला काय जबाबदारी देते ते पाहून निर्णय घेऊ, असे प्रकाश मेहता यांनी म्हटले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेऊन भाजपचे बंडखोर हालचाली करत असल्याचे समजते. भाजपकडून डावलले जाऊनही मोठे मताधिक्य मिळवलेले अनेक उमेदवार सध्या पक्षाची सत्ता गेल्याने अस्वस्थ असल्याचं सांगितलं जातंय.
सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मोठा फटका सहन करावा लागू शकतो अशी भीती बंडखोरांना आहे. त्यामुळे सध्या बंडखोरांकडून हालचालींना जोरदार वेग आला आहे.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
बंडखोरांच्या यादीमध्ये मराठवाड्यापासून ते विदर्भापर्यंत अशा सर्वच भागातील बंडखोरांचा समावेश आहे. त्यामुळे आता हे बंडखोर भविष्याच्या विचाराने नेमकं काय हालचाली करतात हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.
या नेत्यांना भाजपने डावलले होते तरीही यांनी चांगले मताधिक्य मिळवले.
सीमा सावळे - 18429 (दर्यापूर), योगेंद्र गोडे - 29943 (बुलडाणा), दिलीप कंडकुरते - 43357 (नांदेड दक्षिण), शमरजित सिंग घाटगे - 88303 (कागल), राजू बकाने - 39541 (देवळी), नरेंद्र पवार - 43209 (कल्याण पश्चिम), चरण वाघमारे - 79490 (तुमसर), निशिकांत भोसले - 43394 (इस्लामपूर), दिलीप देशमुख - 45846 (अहमदपूर), संतोष जनाथे -30952 (बोईसर), शिवाजी जाधव - 67070 (बसमत), समाधान अवताडे - 54124 (पंढरपूर)
अशा प्रकारची भली मोठी यादी भाजपच्या नाराज बंडखोरांची आहे त्यामुळे आपल्या भविष्याच्या कारकिर्दीसाठी हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
8149624977
_________________________________________________
_________________________________________________




0 Comments