पंढरपूर Live :
'येळकोट येळकोट जय मल्हार' जयघोषात भंडाऱ्याची उधळण
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात व भाविकांच्या उपस्थितीत खंडोबांच्या पालखीवर भंडारा, खोबर्यांची उधळण करीत हेळंब येथे भाविकांनी मनोभावे खंडेरायाचे दर्शन घेतले. मुख्य आकर्षण असलेला पालखी सोहळा पार पडला.त्यामुळे हेळंब गाव अक्षरश: भंडाऱ्यात न्हाऊन निघाले.
तालुक्यातील हेळंब येथे चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा यात्रा महोत्सवाला आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. खंडोबा यात्रेनिमित्त 'श्री' चे दर्शनासाठी मंदिरात भाविकांची पहाटेपासून गर्दी झाली होती. दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या. बीडसह मराठवाड्याच्या कानाकोपर्यातुन भाविक भक्त दर्शनासाठी दाखल झाले. गावातुन खंडोबाची पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. पालखी सोहळा गावापासुन १ किलो मिटर अंतरावर असलेल्या खंडोबा मंदिरात आणण्यात आली.यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषाने हेळंब परिसर दणाणुन गेला होता.
पालखीचे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी दर्शन घेतले. शोभेची दारु उडवून पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीवर भंडारा उधळण्यात आला. ग्रामस्थ पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते.
यात्रा भरली. .......
हेळंब येथीलखंडोबा मंदिर व हनुमान मंदिर समोर यात्रा भरली आहे . यात्रेत खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी होती. उंच व गोलाकार फिरणारे राहटपाळणे आदी खेळांच्या साधनाकडे बालगोपाळांनी मोठी गर्दी केली होती. विविध खेळणी, मिठाई विक्रते व इतर साहित्य विक्रेत्यांचीही दुकाने भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. परळी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
हेळंब येथे खंडोबा यात्रेनिमित्त मराठवाड्याच्या कानाकोपर्यातुन भक्त दर्शनासाठी आले होते. गावातुन खंडोबाची पालखी वाजत गाजत काढण्यात आली. यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषाने हेळंब परिसर दणाणुन गेले होते. पालखीचे ठिक ठिकाणी ग्रामस्थांनी दर्शन घेतले. शोभेची दारु उडवणून पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीवर भंडारा उधळण्यात आला. ग्रामस्थ पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते. दरम्यान ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने मल्लासाठी (पैहलवान) बुधवार दि.04 डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहेत. कुस्ती स्पर्धेत मल्लांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
दरवर्षी खंडोबाच्या यात्रेनिमित्त हेळंब येथे भरणाऱ्या कुस्ती स्पर्धेकडे महाराष्ट्रातील मल्लांचे कुस्तीपटूचे लक्ष लागलेले असते.याही वर्षी बुधवार, दि.04.डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहेत. जंगी कुस्त्यासाठी प्रथम पारितोषिक ५,००१/- ठेवण्यात आले आहे. मैदानात होणाऱ्या स्पर्धेत नामवंत मल्लांचा खेळ पाहावयाचि संधी कुस्तीप्रेमींसाठी मिळणार आहे.
संगणकीय युगामध्ये लोप पावत चाललेल्या कुस्ती या अस्सल मैदानी खेळाची गोडी नव तरुणांमध्ये आवड निर्माण व्हावी, म्हणून प्राचीन ग्रामीण भागात यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा भरविल्या जातात.
परळी तालुक्यातील खंडोबाची सर्वात मोठी यात्रा म्हणून हेळंब येथील यात्रेकडे पाहिले जाते. तीन दिवसीय यात्रेत दर्शनासाठी परळी व परिसरातील ग्रामीण भागातुन भक्त मोठ्या प्रमाणात येतात. हेळंबच्या गावकरी मंडळाच्या वतीने भव्य यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो. तरी पंचक्रोशीतील मल्लांनी कुस्ती स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
8149624977
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments