पालकांनो काळजी घ्या... शिक्षकच बनत आहेत 'भक्षक' ! नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला बलात्कार


Pandharpur Live : 
शिक्षण क्षेत्रात 'शिक्षक' म्हणून ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षकच आता 'भक्षक' बनत चालल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यातील एका शिक्षकाने शाळेतच विद्यार्थिनीशी केलेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता अंबाजोगाई येथील एका क्रीडा शिक्षकानेही 'तोंड' काळे करून घेतल्याची निंदणीय घटना घडली. 

 क्रीडा स्पर्धेसाठी अल्पवयीन विद्यार्थिनी बाहेरगावी गेली असताना या नराधम शिक्षकाने गाडीतच तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर यानंतरही अनेकदा तिला धमकावून वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीय. शिक्षण क्षेत्रात घडत असलेले हे गंभीर प्रकार पाहता  पालकांनीच आता आपल्या मुलांची काळजी घेणं आवश्यक आहे.  आपली मुलं ज्या शैक्षणिक संस्थेत, कोचिंग क्लासेस मध्ये पाठवता तेथे अधुन मधुन पालकांनी भेट देणं आणि सदर संस्थांमधील शिक्षक, कर्मचारी आदींबाबत आवश्यक ती माहिती पालकांनी घेणं अत्यावश्यक बनले आहे. 

अंबाजोगाई येथील निंदणीय घटना
अंबाजोगाई येथील भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या खोलेश्वर विद्यालयामध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शाळेतील क्रीडा शिक्षकाने बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

अंबाजोगाई शहरातील खोलेश्वर विद्यालयामध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर याच शाळेतील क्रीडा शिक्षकाने बलात्कार केला आहे.
हाच  तो नराधम शिक्षक

क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी ही मुलगी शिक्षकासोबत बाहेरगावी गेली होती. स्पर्धेतून परतत असताना वाहनामध्ये शिक्षकाने तिच्यासोबत छेडछाड केली आणि नंतर अंबाजोगाई येथे वाहनामध्येच 17 ऑक्टोबर रोजी तिच्यावर बलात्कार केला. ही घटना कोणालाही सांगू नकोस असे शिक्षकाने विद्यार्थीनीला धमकावले होते. त्यानंतर त्या मुलीवर नराधम शिक्षकाने अनेक वेळा अत्याचार केल्याचेही समोर येत आहे.

पीडित मुलगी भयभीत अवस्थेमध्ये होती. तिची अवस्था शाळेमधील एका महिला शिक्षकाच्या लक्षात आल्यानंतर तिने विद्यार्थीनीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर या घटनेचे बिंग फुटले. त्या मुलीने अंबाजोगाई शहर पोलिसामध्ये तक्रार दिल्यानंतर शाम दिगंबर वारकड क्रीडा शिक्षक, खोलेश्वर माध्यमिक विद्यालय (वय 43) यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी राहुल धस हे अधिक तपास करत आहेत.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

0 Comments