येत्या २२ किंवा २३ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल - शरद पवार


Pandharpur Live : 
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन २० दिवस झाले आहे. मात्र अद्यापही या सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार झालेले नाही. ६ मंत्र्यांनाच सर्व खाते वाटप करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने सरकारवर आरोप देखील होत आहे. दरम्यान येत्या २२ किंवा २३ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिली आहे.

थोड्याच वेळापूर्वी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची बैठक सुरु झाली आहे. बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होत आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांकडे कोणते खाते द्यावे? यावर आजच्या बैठकीत चर्चा होत आहे.

राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदे ही फक्त राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्यांनाच दिली जातील - अजित पवार

मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर 23 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज दिली. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे. अशीही माहिती यावेळी नागपुरात अजित पवार यांनी दिली. तीन आमदारांमागे एक मंत्री असेल. मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या 43 होईल अशी माहिती त्यांनी दिली. सध्या झालेले खातेवाटप ही तात्पुरती व्यवस्था आहे. सात मंत्री अधिवेशनापुरता कारभार करू शकतात. मात्र चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करताना मंत्रिमंडळ विस्तार करावा लागेल. तीनही पक्ष मिळून याबाबत निर्णय घेतील, असे अजित पवार याआधी म्हटले होते.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसांच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे सांगितले होते. तसंच, राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदे ही फक्त राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्यांनाच दिली जातील, इतरांचा विचार होणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. अजित पवारांनी यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात मत व्यक्त केलं आहे. या कायद्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. काहींचं म्हणणं आहे केंद्रानं मंजुरी दिल्यानंतर राज्याच्या मंजुरीची गरज नाही. तर दुसरीकडे राज्याच्या मंजुरीची गरज असल्याचंही सांगितलं जात आहे. दोन दिवसांत नागपूरचं अधिवेशन संपेल. मुंबईला जाऊन ऍडव्होकेट जनरलकडून यासंदर्भात मार्गदर्शन घेऊ. हा कायदा लागू करण्यासंदर्भात माहिती पूर्ण घेतल्याशिवाय बोलणं योग्य ठरणार नसल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

0 Comments