Pandharpur Live :
पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सकाळी पालिकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता बोलावण्यात आली होती. नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली.
सभेत 31 विषयांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान, शहरातील वृक्ष लागवड आणि आरक्षण क्र. 102 मधील जागा गणेश रुग्ण सेवा मंडळास देण्याच्या ठरावास विरोधी नगरसेवकांनी हरकत घेतल्याने काही काळ वादावादी झाली. शहरातील विविध विकास कामांची गुणवत्ता आणि विकासकामे रखडल्यावरून विरोधी नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसून आले.
पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीतील जे मालमत्ताधारक आपल्या छतावरील पावसाच्या पाण्याची साठवणूक करून पुनर्वापर करतील तसेच घरातील ओला आणि सुक्या कचर्याचे कंपोस्ट खत करतील, अशा मालमत्ताधारकांना एकत्रित करामध्ये सवलत देण्याचा ठराव पंढरपूर नगरपालिकेने मंजूर केला.
पंढरपूर शहरात झालेल्या वृक्ष लागवड, आरक्षण क्र.102 मधील जागा गणेश रुग्णसेवा मंडळास देण्यास मंजुरी देणे या विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. मात्र, सत्ताधार्यांनी बहुमताच्या जोरावर हा विषय मंजूर करून घेतला. त्याचबरोबर शहरातील इतर विकास कामासंदर्भात जोरदार वादंग झाले. यावेळी उपनगराध्यक्षा सौ. लतिका डोके, नगरसेवक वामन बंदपट्टे, गुरूदास अभ्यंकर, अनिल अभंगराव, दगडू धोत्रे, महादेव भालेराव, सुधीर धोत्रे, लखन चौगुले, सुजितकुमार सर्वगोड, शकुंतला नडगीरे, श्वेता डोंबे, प्रशांत शिंदे, महादेव भालेराव,विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, अक्षय गंगेकर यांच्यासह मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगरअभियंता पवार आदी उपस्थित होते.
जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करणे, आरोग्य विभागीतल सफाई कर्मचार्यांच्या स्वेच्छा निवृत्ती अर्जास मंजुरी देणे, नगरपालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींंसाठी सन 2020-21 च्या अंदाजपत्रकाच्या 5 टक्के निधीच्या विनियोगास मंजुरी देणे, आरोग्य विभागाकडील जुनी कचरा वाहने विक्री करण्याबाबत निर्णय घेणे, पंढरपूर शहरातील विस्तारित भागात भुयारी गटार टप्पा क्र. 4 साठी प्रकल्प अहवाल तयार करणे करण्यासाठी एजन्सी नेमणे आणि निविदा प्रक्रिया राबवणे, राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निधी खर्चास मंजुरी देणे, पालिकेच्या विविध विभागातील हार्डवेअर नेटवर्किंग देखभाल दुरूस्ती, संगणक साहित्य खरेदी खर्चास मान्यता देणे, केडीएमसी मायनेट प्रणाली देखभाल दुरूस्तीकामी खर्चास मंजुरी देणे, शहर स्वच्छता अभियानांतर्गत पंढरपूर शहरास पंचतारांकित मानांकन मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवणे, पालिकेस आवश्यक त्या विभागातील तांत्रिक कर्मचारी अॅप्रेंटिस म्हणून नेमण्यास मंजुरी देणे, पालिकेच्या विश्रामगृहास सुरक्षिततेच्यादृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, कंपोस्ट डेपो येथे 24 तास वीजपुरवठा करण्यासाठी डी.पी. बसवणे, नामसंकिर्तन सभागृह बांधण्याच्या खर्चास 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणे, पालिकेच्या रुग्णालयास आवश्यक सर्व प्रकारची औषधे शासकीय दरात खरेदीस व बिल अदा करण्यास मंजुरी देणे, गुजराथी कॉलनी येथे कर्मचारी वसाहत संरक्षक भिंत दुरूस्ती करणे, तालुका पोलिस ठाणे ते पंतनगर दरम्यान रस्त्याचे सुशोभीकरण व विद्युतीकरण करणे, त्याचबरोबर पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर 20 कि.वॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प बसवणे व येणार्या खर्चास मंजुरी देणे, नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत कामांना मंजुरी देणे आदी 30 विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

0 Comments