पंढरपूर सिंहगडच्या दिव्या कुलकर्णी हिला सुवर्णपदक

Pandharpur Live : 
पंढरपूर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर येथील महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या कुमारी दिव्या कुलकर्णी हिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडून सुवर्णपदक महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
     सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात कुमारी दिव्या कुलकर्णी हिने अभियांत्रिकीचे शिक्षण  पुर्ण केले आहे.


    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर, विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातुन कुमारी दिव्या कुलकर्णी हिने प्रथम येण्याचा मान पटकाविला होता. २७ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते कुमारी दिव्या कुलकर्णी हिला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले आहे.

      पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वागिंण विकासासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत असून पालक वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.




    सुवर्णपदक प्राप्त केलेल्या कुमारी दिव्या कुलकर्णी हिचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डाॅ. रविंद्र व्यवहारे, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. समीर कटेकर आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________





_________________________________________________
_________________________________________________



_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

0 Comments