7 जानेवारीला होणार मंगळवेढा तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा लिलाव


Pandharpur Live : 
पंढरपूर, दि. 29 :-  मंगळवेढा  तालुक्यातील मौजे सिध्दापूर हद्दीत जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दिनांक 07 जानेवारी  2020 रोजी सकाळी 11.00 वाजता  उपविभागीय  कार्यालय, मंगळवेढा  येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
            मंगळवेढा-मोहोळ तालुक्यातील मौजे मिरी-सिध्दापूर येथील प्रस्तावीक संयुक्त वाळू ठेक्याच्या लिलावातील शिल्लक असलेल्या मौजे सिध्दापूर हद्दीतील भीमा नदी पात्रामधील   महसूल प्रशासनाने वाळू साठ्यावर केलेल्या कारवाईत सुमारे  4 हजार 644.84   ब्रास वाळू साठा जप्त केला आहे.  हा वाळू  साठा मौजे सिध्दापूर हद्दीतील भीमा नदी पात्रालगत गट नं.3 येथे   ठेवण्यात आला आहे. या  ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत  सुमारे तीन कोटी 25  लाख 13 हजार 880  रुपये  इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी  संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी असे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.
           लिलावात भाग घेण्यासाठी  आयकर भरत असल्याचा पुरावा , पॅन नंबर अथवा विक्रीकर विभागाचा टॅन क्रमांक आवश्यक आहे. मंगळवार दिनांक 07 जानेवारी 2020 पुर्वी  निवीदा अर्जाचे विनापरतावा शुल्क  दोन हजार रुपये रोखीने भरावेत तसेच एकूण सरासरी किंमतीच्या  20 टक्के रक्क्म रुपये 65 लाख 2 हजार 776 रोखीने भरावेत. लिलावातील सर्वोत्तम बोलीची रक्कम तात्काळ त्याच दिवशी भारतीय स्टेट बँक शाखा मंगळवेढा येथे चलनाव्दारे जमा करावी.तसेच स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे. 
(बातमीतील छायाचित्र प्रतिकात्मक आहे.)
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

0 Comments