पंढरपूर Live : भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ८० तासांसाठी झालेले मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचे ४० हजार कोटी वाचवले, असा दावा हेगडे यांनी केला आहे. त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. त्यानंतर आता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. फडणवीसांना हेगडे यांचा दावा फेटाळून लावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्राला एक नवा पैसाही परत पाठवलेला नाही. केंद्राकडून पैसा आलाच नाही. याशिवाय काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेतलेला नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
केंद्र सरकारनं कोणत्याही प्रकारचे पैसे मागितले नाही आणि राज्य सरकारनं कोणतेही पैसे केंद्राला दिले नाहीत, हे पूर्णपण चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अनंत कुमार हेगडे म्हणाले की, आमच्याकडे संख्याबळाची कमतरता आहे याची जाणीव भाजपाच्या प्रदेश नेतृत्वासह केंद्रीय नेतृत्वाला देखील होती. विधानसभेत सरकारला बहुमत मिळू शकले नाही आणि सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत ते पुढे गेले. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणं ही एक युक्ती होती. ८० तासांसाठी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे ४० हजार कोटी वाचवले, असं हेगडे यांनी म्हटलं.
अनंत हेगडे यांचा दावा शंभर टक्के खोटा आणि चुकीचा असून महाराष्ट्रानं केंद्र सरकारला कोणताही पैसा परत केलेला नाही. मुळातच बुलेट ट्रेनकरिता एक नवा पैसा केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळालेला नाही. बुलेट ट्रेनसाठी एक कंपनी तयार झालेली नाही. जी केंद्र सरकारची आहे. जेव्हा बुलेट ट्रेनचे पैसे येतील, तेव्हा ते पैसे या कंपनीत येतील, राज्य सरकारकडे येणार नाहीत. तसंच महाराष्ट्र सरकारची भूमिका ही केवळ जमीन हस्तांतरणाची असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.
केंद्र आणि राज्य यांच्या अकाऊंटिंगची सिस्टम ज्यांना समजते, त्यांना असे पैसे आले आणि परत पाठवले असं कधी होत नाही हे कळतं. असं कधीच होतं नाही की, केंद्राकडून पैसे आले आणि परत केले वगैरे. मी जेव्हा काळजीवाहू मुख्यमंत्री होतो, किंवा मुख्यमंत्री असतानाही, निवडणुकीनंतर किंवा त्याकाळात एकही धोरणात्मक निर्णय मी घेतलेला नाही. जो पर्यंत नियमित सरकार येणार नाही, तोपर्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार नसल्याचं मी सांगितलं होतं. त्यामुळे हे जे काही पसरवण्यात येतं आहे ते चुकीचं आणि खोटं आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो की, एक नवा पैसादेखील महाराष्ट्राचा केंद्राला गेला नाही, केंद्रानं तो मागितलेला नाही आणि मागण्याचा विषयही येत नाही. देण्याचा विषय येत नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
हेगडे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. महाराष्ट्राशी गद्दारी केल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्राचा ४० हजार कोटींचा विकासनिधी केंद्राकडे परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाले, भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे सांगत आहेत. ही महाराष्ट्रासोबत गद्दारी आहे, असं राऊत यांनी ट्विट केलं आहे.
नवाब मलिक यांची प्रतिक्रिया
अनंत कुमार हेगडे यांनी केलेले आरोप खरे असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा. हेगडे यांच्या वक्तव्याचा तपास करावा, असं राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक म्हणालेत.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
8149624977
_________________________________________________
_________________________________________________




0 Comments