पंढरपूर Live : बोईसर येथील राममंदिरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित केलेल्या संभाजी भिडे (गुरुजी) यांच्या सभेस येथील विविध संघटनांनी विरोध करत सभा उधळून लावली. या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बोईसरमधील संजयनगर येथील राममंदिरात १ डिसेंबर रोजी संभाजी भिडे यांच्या सभेचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे करण्यात आले होते. मात्र, या सभेस आरपीआय, दलित पँथर, वंचित बहुजन आघाडी, बहुजन क्रांती मोर्चा, बहुजन समाज पार्टी आदी पक्ष, संघटनांनी तीव्र विरोध करत सभा उधळून लावली.
दरम्यान, रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास संजयनगर येथील राममंदिरात संभाजी भिडे यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती मिळताच विविध संघटनांचे पदाधिकारी सभास्थळी पोहोचले.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
भीमा-कोरेगाव दंगलीतील प्रमुख आरोपी भिडे हे असून, याबाबत संपूर्ण समाजात असंतोष निर्माण आहे. भिडे हे शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास सांगत असून, माता जिजाऊबद्दल अपमानास्पद शब्द वापरून समाजामध्ये दुफळी निर्माण करत आहे. शिवाय प्रक्षोभक भाषण करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात.
येत्या ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असून, त्याचा उद्रेक समाजाकडून व्हायला नको तसेच शांतताभंग होऊ नये म्हणून ही सभा त्वरित रद्द करण्यात यावी, असे निवेदन पत्र विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून बोईसर पोलीस ठाण्याला देण्यात आले. या वेळी नवापूर नाका ते धोडीपूजा रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आली होती.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित संभाजी भिडे यांचे व्याख्यान बोईसर येथील राममंदिरामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी कमालीची गोपनीयता राखली गेली होती; परंतु बहुजनवादी आंबेडकरी संघटनांनी व पक्षांनी एकत्रित येऊन प्रखर विरोध दशर्वून हा कार्यक्रम रद्द पाडण्यास भाग पाडले.
हा कार्यक्रम होणार, असे समजताच पालघर जिल्ह्यातील बहुजन समाजाने एकवटून निषेधाचे निवेदन बोईसर पोलीस स्टेशनला दिले. त्या वेळी आयोजक व बहुजन नेत्यांना एकत्रित बोलावून पोलीस प्रशासनाने योग्य भूमिका राखून व कायदा सुव्यवस्था राखून हा कार्यक्रम रद्द केला.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments