Pandharpur Live : विधानसभा कामकाज- दि. 16 डिसेंबर 2019
नागपूर अधि.वृ.वि.7
दि.16.12.2019
विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती
नागपूर, दि. 16 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली.
यावेळी सदस्य सर्वश्री संजय रायमुलकर, धर्मरावबाबा अत्राम, ॲड. श्रीमती यशोमती ठाकूर आणि कालिदास कोळंबकर यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
००००
डॉ. पुरूषोत्तम पाटोदकर/विसंअ/16.12.19
नागपूर अधि.वृ.वि.8
दि.16.12.2019
सरन्यायाधीश शरद बोबडे
शेतकऱ्यांप्रती आस्था असलेलं व्यक्तीमत्व
- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
नागपूर, दि. 16 : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे अतिशय साधं आणि शेतकऱ्यांप्रती आस्था असलेलं व्यक्तीमत्व असून महाराष्ट्राच्या सुपुत्राला मन:पूर्वक अभिवादन करूया, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी श्री.बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी श्री.पटोले बोलत होते.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या
नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैतन्य
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे अभिमानाने ऊर भरून आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैत्यन्य मिळेल, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत व्यक्त केली.
मूळचे नागपूरचे असलेले शरद बोबडे यांचे अभिनंदन नागपूरच्याच अधिवेशनात करता आले, हा दुर्मिळ योगायोग असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. सध्या शरद ऋतू सुरू असल्याचा उल्लेख करीत हा ऋतू म्हणजे नवचैत्यन्याचा असून सरन्यायाधीश बोबडेंच्या रूपाने नवचैत्यन्य येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्या. बोबडे यांनी प्रयत्न केले आहेत. सरन्यायाधीशपदाच्या कारकिर्दीत ते अन्नदात्याला नवचैतन्य मिळवून देतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बोबडे कुटुंबाचे नागपूरमधील निवासस्थान म्हणजे कायद्याचे झाड असून त्या माध्यमातून अनेक निष्णात कायदेतज्ज्ञ तयार झाले आहेत. रामशास्त्री बाण्याने ते न्यायदान केल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्री बाळगतो असे सांगत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुपुत्राचे अभिनंदन केले.
श्री.बोबडे शेतकऱ्यांचे कैवारी होते. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ते सामान्यांचे वकिल होते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश बोबडे यांचे अभिनंदन केले.
००००
नागपूर अधि.वृ.वि.9
दि.16.12.2019
‘वंदे मातरम्’ ने विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात
नागपूर, दि. 16 : विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात वंदे मातरम् ने करण्यात आली. विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री मंडळातील सदस्य, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.
उद्देशिकेचे वाचन
विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी कामकाजाच्या प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. या सभागृहाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा. त्या दृष्टीने कामकाज झाले पाहिजे, असे आवाहन श्री.पटोले यांनी यावेळी केले.
००००
नागपूर अधि.वृ.वि.10
दि.16.12.2019
दिवंगत सदस्यांना आदरांजली
नागपूर, दि. 16 : विधानसभेचे माजी दिवंगत सदस्य माणिकराव सबाणे व अशोक तापकीर यांना आज आदरांजली अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला होता. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री अजित पवार, बबनराव पाचपुते, डॉ.पंकज भोयर, अॅड. अशोक पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
००००
अजय जाधव/विसंअ/16.12.19
फफ
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

नागपूर अधि.वृ.वि.11
दि.16.12.2019
विधानसभा अध्यक्षांना
राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचे निमंत्रण
नागपूर, दि. 16 : छत्तीसगड विधानसभेचे उपाध्यक्ष मनोज सिंह मंडावी यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना छत्तीसगढ येथे दिनांक 27 ते 29 डिसेंबर 2019 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचे निमंत्रण दिले. या नृत्य महोत्सवात विविध राज्य, केंद्रशासित प्रदेशातील कलाकार सहभागी होणार आहेत. चार नृत्य प्रकारात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. श्री. पटोले यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे.
००००
नागपूर अधि.वृ.वि.12
दि.16.12.2019
तरुण पिढीला शेतीकडे वळवण्याचे काम
कृषी विद्यापीठाला करावे लागेल
- नाना पटोले
कृषी पदवीधारक आमदारांचा सत्कार
ॲग्रोव्हेट-ऍग्रोइंजि मित्र परिवार संघटनेचा पुढाकार
नागपूर, दि. 16 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा देशात लौकिक आहे. शेतकऱ्यांना नवीन संशोधनाचा, नवीन तंत्रज्ञानाचा फायदा मिळवून देण्यासोबतच, तरुण पिढीला शेतीकडे वळवण्याचे महत्त्वाचे काम पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला करावं लागेल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
ॲग्रो व्हेट -ॲग्रोइंजि मित्र परिवाराच्या वतीने कृषी पदवीधारक विधानसभा सदस्यांचा सत्कार समारंभ आज पंजाबराव देशमुख स्मृती स्मारक परिसराच्या आवारात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कृषी मंत्री सुभाष देसाई, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले, सत्कारमूर्ती आमदार सर्वश्री अनिल देशमुख, ॲड. अशोक पवार, श्यामसुंदर शिंदे, शेखर निकम, मनोहर चंद्रिकापुरे, अमर वऱ्हाडे, ॲग्रोव्हेट- ॲग्रोइंजि मित्र परिवार संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहितकर, प्रणय पराते, डॉ. सुनील सहतपुरे, मिलिंद राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी संघटनेने विद्यार्थी व शेतकऱ्यांकरिता खुले अध्ययन केंद्र उभारण्याकरिता आर्थिक सहाय्यासाठी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कृषी पदवीधर आमदारांना एकत्र करण्याचं काम ॲग्रोव्हेट- ॲग्रोइंजि संघटनेने केले असे कृषिमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले. सध्या शेती हा राज्यासमोरील गंभीर प्रश्न आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीत बदल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे. यासाठी हे सुशिक्षित शेतकरी आमदार राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा विडा उचलतील, अशी अपेक्षा श्री देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला निश्चित विकासाच्या मार्गावर पुढे नेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००
नागपूर अधि.वृ.वि.13
दि.16.12.2019
विधिमंडळ परिसरात ‘लोकराज्य’मासिकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
विविध दुर्मिळ अंकांनी वेधले लक्ष
नागपूर, दि. 16 : राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या दुर्मिळ आंकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते आज करण्यात आले.
विधिमंडळ परिसरातील या उद्घाटन कार्यक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल, संचालक सुरेश वांदिले, उपसंचालक (वृत्त) गोविंद अहंकारी, विशेष कार्य अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी, अकोला डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा माहिती अधिकारी यवतमाळ राजेश येसनकर, वरिष्ठ सहायक संचालक डॉ.सं.शि. खराट, सहाय्यक संचालक शैलजा वाघ-दांदळे, व अन्य अधिकारी उपस्थित होते.
विधीमंडळ परिसरात प्रवेश करताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने उभारण्यात आलेले लोकराज्य मासिकाचे प्रदर्शन येणाऱ्या- जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. हिवाळी अधिवेशनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाने हा उपक्रम राबविला आहे. या प्रदर्शनात 1964 पासूनचे अनेक विशेषांक पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये बालगंधर्व विशेषांक, शाहू महाराज यांच्या राज्यरोहण सोहळा शताब्दीनिमित्त प्रकाशित विशेषांक, धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव विशेषांक, ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी (नोव्हेंबर 1990), सानेगुरुजी, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, महात्मा गांधी, स्वातंत्र्य दिन, विदर्भ विशेषांक (2011 व 2017) अखिल भारतीय साहित्य संम्मेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विशेषांक, निवडणूक, शेती, सिंचन, बेटी बचाव संदर्भातील विशेषांक, शिक्षण, वन, पर्यटन यासह इतरही विषयाला परिपूर्ण वाहिलेले विशेषांकही उपलब्ध आहेत.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित ‘महामानव’ ही पुस्तके विक्रीस ठेवण्यात आली आहेत.
सुरुवातीच्या काळात लोकराज्य अंक हे कृष्णधवल (ब्लॅक ॲण्ड व्हाईट) मुद्रीत केलेले असायचे. 2006 पासून लोकराज्य मासिक रंगीत स्वरुपात मुद्रीत करुन वाचकांच्या हातात पडू लागले आहे. कालानुरुप ‘लोकराज्य’मध्ये बदल होत आला आहे. सुरुवातीला केवळ शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयोगात येणारे हे मासिक इतरही एक-एक विषयाला वाहण्यात आले. मांडणी, आशय आणि सजावट यामध्येही हळूहळू बदल झाला. इंग्रजी, ऊर्दु, गुजराती आणि हिन्दी या भाषांमधूनही लोकराज्य प्रकाशित होत असून ते सर्व अंक ऑनलाईनही उपलब्ध असतात.
दुर्मिळ अंक
1964-पंडित जवाहरलाल नेहरु, 1971, 72, 73, 75, 79, 1980- ऑगस्ट स्वातंत्र्यदिन विशेषांक, 2001- डॉ. पंजाबराव देशमुख विशेषांक, 1997- ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी, 1987- बालगंधर्व, 1999- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी विशेषांक, 1991- सुधाकरराव नाईक, 1996- सावित्रीबाई फुले विशेषांक, 2012- यशवंतराव चव्हाण विशेषांक- यशवंत कीर्तीवंत, दुर्मिळ अंक वि. दा. सावरकर, राजर्षी शाहू महाराज, 1972- मराठवाडा विकास विशेषांक, रविद्रनाथ टागोर विशेषांक, आरोग्य संपदा विशेषांक, अहिल्याबाई होळकर, विदर्भ विशेषांक आदीसह अनेक दुर्मिळ विशेषांक या प्रदर्शनात पहावयास उपलब्ध आहेत.

0 Comments