शेतकऱ्यांपेक्षा सावरकरांचाच मुद्दा महत्त्वाचं असल्याचं विरोधकांनी दाखवून दिलं... आ. बच्चू कडू यांचा विरोधकांना टोला


Pandharpur Live : 
विरोधीपक्षात अभ्यासू नेते आहेत. त्यांना शेतकरी प्रश्नी आवाज उंचावून लोकांची मने जिंकता आली असती. मात्र त्यांनी तसं केल नसून आम्हाला शेतकऱ्यांपेक्षा सावरकरांचाच मुद्दा महत्त्वाचं असल्याचे विरोधकांनी दाखवून दिले. विधीमंडळात शेतकरी कर्जमाफीसंदर्भात काहीही चर्चा झाली नाही. या संदर्भात भूमिका घेणे विरोधी पक्षाचे काम असते. विरोधक वीर सावरकरांच नाव घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सावरकरांविषयीचं प्रेम महत्त्वाचं नसून यावरून राजकारण करता येतं का हे भाजपकडून पाहिले जात आहे. सावरकर यांच्यासारख्या महापुरूषांचे नाव घेऊन भाजप राजकारण करेल, याची अपेक्षा केली नव्हती. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी प्रश्नांवर विरोधकांना आक्रमक होता आले असते, परंतु तसं झालं नसल्याचा टोला आमदार बच्चू कडू यांनी विरोधकांना लगावला.

मला आज दिवसभरात 100 मॅसेज आले आहेत. कर्जमाफी कधी मिळणार, आर्थिक मदतीचं काय झालं अशी विचारणा आपल्याला होत आहे. शेतकऱ्यांना या अधिवेशनाकडून आशा असते. त्यात विरोधकांनी भावनिक मुद्दे समोर आणल्याने शेतकऱ्यांना अडचण होते. सावरकरांचा मुद्दा शेवटच्या दोन दिवसांत घेता आला असता, अस कडू यांनी सांगितले.

दरम्यान कर्जमाफी हा मुद्दा तातडीचा नाही. कर्जमाफी व्यवस्थीत हातळण्याचा विषय आहे. कर्जमाफी ही केवळ मलपट्टी आहे. त्याची शस्त्रक्रिया आवश्यक आहे. त्यातून शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, असंही मत कडू यांनी मांडले. तसेच कर्जमाफीसाठी एक महिना तरी लागले, असंही त्यांनी सांगितले.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

0 Comments