भाजपाचे सावरकर प्रेम म्हणजे ढोंगीपणा - संजय राऊत


Pandharpur Live : 
राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून वादळ उठले आहे. त्यावर राऊत यांनी सावरकरांबद्दल महाराष्ट्रातील काँग्रेसच्या लोकांनी राहुल गांधी यांना माहिती देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. तथापि भाजपाचे सावरकर प्रेम हे निव्वळ ढोंग आहे. भाजपाचे सावरकर प्रेम म्हणजे ढोंगीपणा आहे. साडेपाच वर्ष मोदींचे सरकार केंद्रात आहे. मी स्वत: सुरुवातीपासून सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केंद्राकडे करत आहे मग आतापर्यंत का दिला नाही, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. अलिबाग येथील आपल्या निवासस्थानी राऊत यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबईतील सावरकरांचे स्मारक केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विचारले असता, माझा सर्वात जास्त विश्वास अजित पवारांवर आहे. नवे राज्य सरकार गठीत होत असताना अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या; परंतु शरद पवारांवर माझा विश्वास आहे. त्यामुळे अजित पवार यांचे योगदान महत्त्वाचे असेल. आगामी काळात अजित पवार हे मुख्यमंत्र्यांचे खंदे समर्थक म्हणून काम पाहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अधिवेशन काळात सरकारला कुठलाही धोका नाही. हे सरकार पडेल, असे मनातले मांडे कुणी खाऊ नये. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर उभे आहे. त्यावरच ते काम करतंय. राज्यातील आघाडीचे सरकार मजबूतपणाने आपला कार्यकाळ पूर्ण करेल.

एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर काय बोलते यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून नाही. राज्यातील सरकार आणि सावरकर हे स्वतंत्र विषय आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

0 Comments