नागपूर- विधानसभा हिवाळी अधिवेशनातील आजच्या महत्वाच्या घडामोडी... जाणुन घ्या महाराष्ट्र सरकारचे आजचे सर्व महत्वाचे निर्णय! एकाच क्लीकवर!


Pandharpur Live : 
नागपूर अधि.वृ.वि.54
दि.19.12.2019
‘एमआयडीसी’च्या वाढीव सेवा शुल्कास स्थगिती
- सुभाष देसाई
नागपूरदि. 19 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दि. 11 नोव्हेंबर 2019 च्या परिपत्रकान्वये वाढविलेल्या सेवा शुल्क आदेशास स्थगिती देण्यात येऊन यासंदर्भात शासनस्तरावर फेरविचार करण्यात येईलअशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानपरिषदेत व विधानसभेत निवेदनाद्वारे केली.
श्री. देसाई यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे कीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने राज्यभरात विविध प्रकारची औद्योगिक क्षेत्रे विकसित केली असून यात प्रामुख्यानेरस्तेदिवाबत्तीपाणीपुरवठा वितरण व्यवस्था व अनुषंगिक सेवा पुरवण्यासाठी महामंडळास जो खर्च करावा लागतोत्याची प्रतिपूर्ती सेवा शुल्काद्वारे केली जाते. या सेवा सुविधावरील खर्चात मागील दहा वर्षात झालेली वाढ विचारात घेऊन सुधारित सेवा शुल्क लागू करण्यात आले आहे. तरीसुध्दा 100% वाढीव खर्चाची प्रतिपुर्ती करता येत नाही.
          महामंडळाने केलेल्या वाढीव सेवा शुल्काबाबत विविध औद्योगिक संघटनांनी मुख्यमंत्री  यांना समक्ष भेटून निवेदनाद्वारे वाढीव शुल्क पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्याबाबत विनंती केली आहे. सध्याचे आर्थिक व औद्योगिक जागतिक मंदीचे वातावरण तसेच उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या विचारात घेता सेवा शुल्कात झालेली वाढ ही अवाजवी असल्याने यास स्थगिती देण्याबाबत विनंती या संघटनांनी केली आहे.
          या सर्व स्थितीचा व निवेदनांचा मागण्यांचा व सद्य:स्थितीतील आर्थिक व औद्योगिक परिस्थितीचा सर्वंकष विचार करून महामंडळाने वाढविलेल्या सेवा शुल्कास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासंबंधी फेरविचार करण्यात येईलअसेही त्यांनी यावेळी नमूद केले.
०००० 
नागपूर अधि.वृ.वि.51
दि.19.12.2019
राईस मिलकडील शिल्लक तांदुळप्रश्न
समन्वयाने मार्गी लावण्याचे निर्देश
-  नाना पटोले
नागपूरदि. 19 : तांदूळ उत्पादक जिल्ह्यातील सन 2012-13 कालावधीत राईस  मिलकडे शिल्लक राहिलेल्या तांदूळप्रकरणी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने तोडगा काढून प्रश्न मार्गी लावावाअशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिल्या.
विधानभवनात श्री.पटोले यांच्या उपस्थितीत यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.
श्री.पटोले म्हणालेधान उत्पादक शेतकऱ्यांचा तांदुळ राईस मिलकडे शिल्लक राहिल्याप्रकरणी प्रशासनाने मार्ग काढणे गरजेचे आहे. अन्नधान्य ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याची हानी होऊ नये याबाबत दक्षता घेणेही तितकेच महत्वाचे आहे. पुढील नवीन वर्षापासून तांदुळ उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या मालाचा मोबदला आणि साठवणुकीची व्यवस्था उपलब्ध होईल असे नियोजन करावे. तसेच शेतकरी हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावीअसे निर्देशही त्यांनी दिले. तांदुळ उत्पादक जिल्ह्यातील सन 2012-13 कालावधीत राईस मिल्सकडे शिल्लक राहिलेल्या तांदुळप्रश्नी व प्रलंबित असलेली वसुली आणि तांदुळ उत्पादनासाठीच्या शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही श्री.पटोले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सतीश सुपेवित्त विभागाचे उपसचिव बि.धांडेमार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक श्री.नेरकरआदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सरोदेगोंदियाचे जिल्हा पुरवठा अधिकारी आदी उपस्थित होते.
००००



नागपूर अधि.वृ.वि.52
दि.19.12.2019
मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या
प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक
नागपूरदि. 19 : मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) विद्यार्थ्यांना शाळेमध्ये  पाठ्यपुस्तक आणि गणवेश मोफत मिळावा याबाबतचा शासन निर्णय तातडीने काढणे0 ते 6 वयोगटातील खासगी बालवाडीनर्सरीकेजी यापैकी नोंदणी झालेल्या किती आहेत. याबाबत शासन निर्णय लागू करण्याबाबतशिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रवेश प्रक्रियेच्या नियमानुसार शाळा ते घर यामधील अंतर यासंदर्भात तसेच एस.सी.एस.टी. आणि ओ.बी.सी. घटस्फोटीत महिलांकरिता त्यांच्या स्वत:चे जातप्रमाणपत्र मिळण्याबाबतमोफत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांच्या उत्पन्नात वाढ करणेऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये येणाऱ्या समस्याआरटीई अंतर्गत वर्ग 5 ते 8 पर्यंतचे विद्यार्थी मोफत शिक्षणापासून वंचित राहत असणे, व यासंदर्भातील अन्य विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
याबाबत श्री.पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ऑनलाईन नोंदणीसंदर्भात शिक्षण विभाग व महिला व बालविकास विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचेही श्री.पटोले यांनी सांगितले.
बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णाआरटीइचे अध्यक्ष मोहमद शहिद शरीफउपसचिव राजेंद्र पवारशिक्षण संचालक पुणे दत्तात्रय जगतापशिक्षण उपसचिव सतीश मेंदे आदी उपस्थित होते.
००००
विधानसभा कामकाज-2019
नागपूर अधि.वृ.वि.50
दि.19.12.2019

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस मुख्यमंत्र्यांचे उत्तर
कमी बोलून जास्त काम करण्याचा निर्धार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागपूर दि. 19 : राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आमच्या सरकारची मार्गदर्शिका असून कमी बोलून जास्त काम करायचे असे आम्ही ठरविले आहेअसे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील संताचा तो प्रचार अमरअजूनही लोक-मनावरराज्य चालवोनी निरंतरलाखो जीवा उद्धरितो’ या ओव्यांनी सरकारची पुढची वाटचाल स्पष्ट केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. सदस्य सुनिल प्रभू यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचा अभिनंदनपर ठराव मांडला होता. यावर 51 सदस्यांनी आपली मते मांडली.
राज्यपालांनी मराठीत अभिभाषण केले. त्यांना धन्यवाद देत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले कीसंत गाडगेबाबांनी साध्या भाषेत जीवनाचे सार सांगितले आहे. त्याप्रमाणे भुकेल्याला अन्न देणेतहानलेल्याला पाणी देणेवस्त्र देणेनिवारा देणेखचलेल्यांना जगण्याची हिंमत देणे अशा पद्धतीचे काम सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्थगिती नव्हे प्रगती सरकार
आमचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहेअसे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीकोणत्याही कामांना स्थगिती दिली नसून विकासकामांच्या आदेशांमधील त्रुटी दूर करून कामे सुरू केली जातील.
विकासाचा गोवर्धन पेलुयात
देशातील वैभवशाली आणि संपन्न राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा गोवर्धन पेलण्याकरिता सगळ्यांनीच एकत्र आले पाहिजेअसे आवाहन करतानाच हे सरकार राज्यातील जनतेला चिंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाहीअशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. नवा महाराष्ट्र घडवतांनाच आपले राज्य अधिक महान होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतीलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणार
गोरगरिबांना बुलेट ट्रेन परवडणारी नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीआरोग्यशिक्षण या क्षेत्रात आम्ही सुधारणा करण्यावर भर देणार आहोत. शेतकरीमहिला यांच्या समस्या आमच्या दृष्टीने प्राधान्याच्या राहतील. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करणार आहोत. त्याचप्रमाणे राज्याची खरी आर्थिक स्थिती देखील जनतेसमोर आणणार आहोतअसेही ते म्हणाले.
मराठी बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही
राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांवर आपण एकत्र येऊन महाराष्ट्राचा लौकिक आणखी वाढवूया असेही ते म्हणाले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यावर आपण भर देणार असून कर्नाटक व्याप्त प्रदेशातील मराठी बांधवांवर कदापि अन्याय होऊ देणार नाही ही आमची भूमिका आहे.
राज्यात मंदीमध्ये गुंतवणूक वाढीचे आव्हान
महाराष्ट्राचा उद्योगामध्ये देशात चांगला लौकिक आहेपण सध्या मंदीचे वातावरण असून राज्यात गुंतवणूक वाढीचे मोठे आव्हान आहे. विविध कारणांमुळे ही परिस्थिती असून आमचे सरकार सर्वांच्या सहकार्याने यातून मार्ग काढेलअसेही मुख्यमंत्री म्हणाले.
गाडगेबाबांच्या उपदेशाप्रमाणे काम करणार
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात संत गाडगेबाबा यांच्या वचनांचा उल्लेख केला. गाडगेबाबांना अभिप्रेत असलेल्या धर्माच्या संकल्पनेनुसार राज्यकारभाराची दिशा ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. आपल्या जबाबदारीची जाणीव कायम राहावी म्हणून मंत्रालयातील आपल्या दालनात गाडगेबाबांचे हे विचार प्रदर्शित करण्यात येतील. या विचारांना अनुसरून बेरोजगारांना रोजगारअंध-अपंगांना औषधोपचारसामान्य जनांचे शिक्षण आणि जनतेला मूलभूत सुविधा देणारे हे सरकार असेल.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

0 Comments