पंढरीत लेझीम, लाठी-काठी, दांडपट्टा, तलवार, भालाफेक आदी शिवकालीन मर्दानी खेळांचा अविष्कार... शिवम् ट्रेडर्स चे आयोजन







Pandharpur Live : 

पंढरपूर (प्रतिनिधी):- दि. 21 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 7 वाजता पंढरीत शिवकालीन मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. शिवम् ट्रेडर्स या फर्मने आयोजत केलेल्या या कार्यक्रमाद्वारे मर्दानी खेळांचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूरच्या ताराराणींच्या लेकींचा ‘झंझावात’ पंढरपूरकरांना पाहता आला.

शनिवारी सायंकाळी 7 वाजता येथील शिवम, ट्रेडर्स, शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कोल्हापूर येथील क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाड्याचे वस्ताद प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील, चेतन पाटील, प्रथमेश पाडळकर, वेदांत पाटील, अनुज पाटील, शीतल पाटील, काजल पाटील, सानिका जाधव, लक्ष्मी पाटील, कस्तुरी पाटील, अमृता पाटील, ऋतुजा पाटील, वैष्णवी सरनाईक, अनिल लोखंडे, बाळू वाघमारे  या मर्द  मावळ्यांनी लेझीम, लाठी-काठी, दांडपट्टा, तलवार, भाला, विटा, फरीगदगा, लिंबू काढणी, मावळ्यांच्या पोटावर व गळ्यावर ठेवलेला पानाचा विडा किंवा काकडीचे तलवारीने अचूकपणे दोन तुकडे करणे, काठीने मावळ्यांच्या दंडावर, डोक्यावर ठेवलेले नारळ फोडणे आदी कलागुणांचे सादरीकरण केले.

मुलींना  स्वरक्षणाचे  धडे  देऊन  त्यांचे मन, मनगट आणि मेंदू कणखर  बनविण्याचे कार्य कोल्हापूरचे वस्ताद प्रमोद पाटील यांनी सुरू केले आहे, जेण ेकरून मुली स्वतःचे  आत्मसंरक्षण करू शकतील याची अनुभूती पंढरपूरकरांना आली.  यावेळी शिवम् ट्रेडर्स चे संचालक विजयकुमार गायकवाड, पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक भगवान वानखेडे समाजसेवक ओंकार बसवंती, सौ.आरतीताई बसवंती यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटन राज आवताडे यांच्या शुभहस्ते झाले. हा कार्यक्रम पहाण्यासाठी अनेक युवक, युवती, विद्यार्थी व पालकांनी मोठी गर्दी केली होती.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

0 Comments