आयोध्येत दहशतवादी हल्ल्याचा इशारा... बंदोबस्तात वाढ


Pandharpur Live : 
जैश ए महमंद या दहशतवादी संघटनेकडून दहशतवादी हल्ला होण्याची शक्‍यता असल्याचा इशारा गुप्तचर खात्याने दिल्याने या शहरातील पोलिस बंदोबस्त उत्तर प्रदेश सरकारने वाढवला आहे. आयोध्येत असे हल्ले घडवण्यासाठी जैशचा म्होरक्‍या मसूद अझर याने संपर्क केले असल्याचे गुप्तचर खात्याने म्हटले आहे.

टेलीग्राम या समाज माध्यामातून अझरने आपल्या हस्तकांशी संपर्क साधला आहे. भारतात घातक आणि परिणामकारक घडवण्याचे आदेश मसूदने त्या माध्यमातून दिले आहेत. गेल्या महिन्यात नेपाळ सीमेवरून सात पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले असल्याचा इशारा गेला महिन्यात दिला होता.

या सात पैकी पाच जणांची ओळख पटली आहे. अबु हमझा, महंमद याकूब, निसार अहमद, महमंद शेहबाझ, आणि महंमद कौमी चौधरी अशी त्यांची नावे आहेत.

सीमा रेषेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करूनही पाकिस्तान भारतात दहशतवादी घुसवण्याच्या प्रयत्नात असतो. या दहशतवाद्यांना स्थानिकांकडून आश्रय मिळाला आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आहे. मात्र ते कोठे हल्ला करणार आहेत याचा नेमका उल्लेख गुप्तचर खात्याने केला नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आयोध्येत लवकरच गगनचुंबी राममंदीर बांधण्यात येईल अशी घोषणा केली होती. या पार्श्‍वभूमीवर आयोध्येत सुरक्षेचा आदेश देण्यात आला. त्यानंतर तेथे संरक्षण व्यवस्था कडेकोट करण्यात आली. भारताने मसूद अझरला सप्टेंबर महिन्यात सुधारीत बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायद्यानुसार दहशतवादी जाहीर केले आहे.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

0 Comments