स्वेरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ वा महापरिनिर्वाण दिन साजरा


Pandharpur Live : 
पंढरपूरः- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूरमध्ये  संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ हे मार्गदर्शन करत होते.   
           प्रारंभी महामानवभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ म्हणाले की ,जगातील कोणत्याही माणसाने एवढे वाचन केले नसेल इतके वाचन भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी केले आहे. त्यांनी अनेक पदव्या संपादित केल्या असून जगात एवढ्या पदव्या अद्याप पर्यंत कोणीही घेतलेल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा भारतानेच नव्हे तर संपूर्ण जगाने स्विकार केला आहे.’ असे सांगून अनेक महत्वाच्या घटना सांगितल्या. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील म्हणाले की, ‘डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारी अशी आहे.’ असे सांगून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रा, सुरज रोंगे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. आर.आर. गिड्डेप्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. डी.एस. चौधरी, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर.पाटील, मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख प्रा. सचिन सोनवणेकॉम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. भुवनेश्वरी मलेनिमठ, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूतेरजिस्ट्रार राजेंद्र झरकर, अमोल चंदनशिवे यांच्यासह अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम. एम. पवार यांनी सूत्रसंचालन केले तर सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांनी आभार मानले.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments