अजित पवार यांच्यासोबतीने गनिमी कावा केला पण.... अजित पवार फसलेल्या गनिमी काव्याचे नायक ठरले - देवेंद्र फडणवीस


Pandharpur Live : 
अजित पवार यांच्या सहाय्याने आम्ही शपथविधी केला. अजित पवार यांच्यासोबतीने आम्ही गनिमी कावा केला. परंतू आमचा गनिमी कावा काही कारणाने फसला. अजित पवार आमच्या फसलेल्या गनिमी काव्याचे नायक आहेत तर मी सहनायक आहे, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचे अनेक पदर उलगडून सांगितले.

अजित पवार यांच्याबद्दल आता आपलं काय मत आहे? या प्रश्नावर ते आमच्या फसलेल्या गनिमी काव्याचे नायक आहेत तर शरद पवार मात्र देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची आमची दुश्मनी नाही, असं फडणवीस म्हणाले.

मुलाखतकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना रॅपिड फायर पद्धतीने काही प्रश्नांची उत्तर विचारली. धनंजय मुंडे यांच्यावरच्या प्रश्नाला विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केलं. त्यांनी सातत्याने भाजपवर आणि पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. मी सातत्याने पंकजांच्या पाठिशी उभा राहिलो आणि त्यांनी भाजपवर केलेले आरोप खोडून काढले. ते आता नवीन रोलमध्ये येतील त्यानंतर त्यांचं काम पाहून मी त्यांच्यावर अधिकचं बोलेल, असं उत्तर फडणवीसांनी दिलं.
पंकजा मुंडे या माझ्या भगिनी असल्यासारखे आहेत आणि माझ्या सहकारी आहेत. मी कालही त्यांच्या पाठिशी होतो आजही आहे आणि उद्याही राहिल, असं ते म्हणाले तर उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत. त्यांच्याशी माझे मित्रत्वाचे संबंध कायम राहतील, असंही फडणवीस म्हणाले. तसंच राऊतांचं नाव घेतल्यावर त्यांनी लिहिताना आणि बोलताना जरासं सांभाळून, असा सल्ला राऊतांना देणं पसंत केलं.

पंकजाताईंच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहिलो. मुंडेसाहेब गेल्यानंतर पंकजाताईंना आम्ही कोअर कमिटीमध्ये घेतलं. त्याच्यानंतर त्या मंत्री झाल्या, मंत्री असतानाही त्यांच्याकडे दोन्ही महत्त्वाची खाती होती. ग्रामविकास होतं आणि महिला बालविकास खातं त्यांच्याकडे होतं. त्यांना टार्गेट करण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला, तेव्हा त्यांच्या पाठीशी मी उभा राहिलो. मुंडे साहेबांबद्दल आम्ही केलं होतं, त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदराची भावना आहे. कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील, असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे.

मुंडेसाहेबांचं स्मारक आम्ही बांधलं नाही, असं खडसे म्हणाले, पण ते अत्यंत चुकीचं आहे. खडसेंना उद्धव ठाकरेंकडे जाऊन स्मारकासाठी पैसे मागण्याची गरज नव्हती. मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी आमच्या सरकारनं 46 कोटी रुपये मंजूर केले होते. मुंडेंच्या स्मारकाचं लेटर ऑफ एक्स्पेटन्स हे निवडणुकीच्या चार महिन्यांपूर्वीचं आहे. उद्धव ठाकरेंनी जर स्थगित केलं असेल तर जावं लागेल. 



_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क 
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
      उपसंपादक-विजयकुमार माणिकराव गायकवाड   
मोबा.  8308838111, 8149624977, 7083980165
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments