पंढरपूर- मंगळवेढा मार्गालगतचे वृक्षसंवर्धन संकटात... झाडांच्या लोखंडी जाळ्यांची चोरी

पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील मंदिर समितीने वृक्षारोपण केलेल्या झाडांच्या लोखंडी जाळ्यांची चोरी झालीय. त्यामुळे येथील वृक्षसंवर्धनाच्या कार्यात बाधा आली आहे. सदर मार्गाच्या रंदीकरणाचे काम झाल्याने या मार्गाच्या दोन्ही बाजुला असलेली विशाल वृक्ष तोडली गेली. यामुळे येथील नव्याने झालेल्या वृक्षारोपणानंतर सदर झाडांचे संगोपन होणे अत्यावश्यक आहे. परंतु चोरट्यांनी झाडांच्या सुरक्षेसाठी बसवलेल्या लोखंडी जाळ्यांचीच चोरी केल्याने सदर वृक्षसंवर्धनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments