पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरीतील जुना कराड नाका परिसरातील गाताडे प्लॉट येथील एका घराच्या स्वयंपाक खोलीची खिडकी उचकून घरात प्रवेश मिळवून चोरट्यांनी लाखो रूपये किंमतीचे सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोकड रक्कम लंपास केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुधीर ज्ञानेश्वर भातलवंडे रा. माऊली बंगला, रुक्मिणी बँकेसमोर, जुना कराड नाका, गाताडे प्लॉट यांचे घर चोरट्यांनी फोडले. घरातील गोदरेज कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोकड रक्कम लंपास केली. शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोहेकॉ सुजित उबाळे हे करत आहेत.


0 Comments