Pandharpur Live :
करकंब (ता. पंढरपूर) येथील राजेश शांतिकुमार शहा यांच्या कसबा पेठेतील शांतीपुष्प कॉम्प्लेक्स या राहत्या घरातील गोदामाचे पहाटे पहाटे पाचच्या दरम्यान दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह नऊ लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेश शांतिकुमार शहा यांच्या दुकानाच्या गोदामाचे शटर उचकटून आतील बाजूच्या ग्रीलचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानाच्या ड्रावरमधील व घरातील कपाटातील दोन लाख 10 हजार रुपये किमतीच्या प्रति 10 ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या अंगठ्या, एक लाख 22 हजार 500 रुपये किमतीच्या प्रति पाच ग्रॅम वजनाच्या सात सोन्याच्या रिंग, एक लाख 40 हजार रुपये किमतीच्या 40 ग्रॅम वजनाची सोन्याच्या जपमाळ, 49 हजार रुपये किमतीची प्रति सात ग्रॅम वजनाची दोन जोड सोन्याची कर्णफुले, 35 हजार रुपये किमतीची प्रति पाच ग्रॅम वजनाची दोन सोन्याची कर्णफुले, 87 हजार 500 रुपये किमतीचा 25 ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा नेकलेस, 35 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे पान, एक लाख पाच हजार रुपये किमतीचे प्रति पाच ग्रॅम वजनाची सहा सोन्याची पाने, 10 हजार रुपये किमतीचे दोन सोने विरहित मोत्याचे हार, 70 हजार रुपये किमतीची अडीच किलो चांदीची नाणी व जुने दागिने, 65 हजार रुपये रोख रक्कम व तीन हजार रुपये व पोलो कंपनीचे पॉकेट असा एकूण रोख रकमेसह नऊ लाख 32 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून पलायन केले आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश मुंढे तपास करीत आहेत.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

0 Comments