सोलापूर- महिला वकिलास डास मारण्याचे विषारी द्रव्य पाजण्याचा प्रयत्न


Pandharpur Live : सोलापूर दि. 6 
शिंदे चौक येथे राहणाऱ्या अॅड. रेडकर यांना जबरदस्तीने डास मारण्याचे द्रव पाजण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. निखिल भोसले (वय ३५, होडगी रोड) असे त्याचे नाव आहे. सिव्हिल हाॅस्पिटल परिसरातील चौकात एका वकिलाच्या कार्यालयात हा प्रकार घडला. रेडकर त्या कार्यालयात येऊन बसल्यानंतर भोसले यांनी 'तुम्ही आमच्या बाजूने जबाब द्या.

त्यासाठी तीन लाख रुपये देतो', असे सांगितले. रेडकर यांनी 'पैसे नको' म्हटल्यानंतर बाटलीतील डास मारण्याचे द्रव (ऑल आउट लिक्विड) त्यांच्या तोंडात ओतण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावेळी कुणीच मदत केली नाही, असेही त्यात म्हटले आहे. जेल रोडचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार तपास करीत आहेत.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments