कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम येथे बंद पडलेल्या दुकानाचा वापर वेगळ्याच कारणासाठी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांना टाकलेल्या छाप्यात ३ जोडप्यांना ताब्यात घेतले आहे. या दुकानात जोडप्यांना सोडण्यात येत होते आणि बाहेरून कुलूप लावण्यात येत होते. या प्रकरणी तीन जोडप्यांना अश्लील चाळे करताना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी स्टेडिअम येथे एका दुकानात कोल्ड्रिंक हाऊस होते. ते काही कारणामुळे बंद झाले, मग या बंद दुकानाचा वापर मालकाने वेगळ्या कारणासाठी करण्याचे ठरवले. त्याने केलेही तसे. या दुकानात एका मागून एक जोडप्यांना सोडण्यात येत होते.


0 Comments