पंढरपूर - माध्यमाच्या भाउगर्दीत पत्रकाराने वेगळेपण जपावे- डॉ मिलिंद परिचारक


Pandharpur Live :  मानवी आयुष्यात आपल्या दिवसाची सुरूवात वाचनाने होते. पत्रकारही सजगपणे लिखाण करीत असतात. मात्र सध्या माध्यमाचा वाढत्या भाउगर्दीमधे पत्रकारांने आपले वेगळेपणे व विश्वासार्हता सिध्द करणे गरजेचे आहे. तरच वाचकांची साहीत्यतृष्णा शमली जाउ शकते. असे प्रतिपादन उमा महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ मिलिंद परिचारक यांनी केले. 


  उमा महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्राच्या पत्रकारीता विभागाच्या वतीने पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिना अभिवादन करण्यात आले. तसेच माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला. तसेच पत्रकारीता अभ्यासक्रमांच्या चौथ्या बॅचचा प्रारंभ देखिल करण्यात आला. याप्रसंगी संकेत कुलकर्णी , संदिप पिटके , शशिकांत दुनाखे उपस्थित होते. 


     प्रसंगी पुढे बोलताना प्राचार्य डॉ परिचारक म्हणाले , पत्रकारांनी लिखाण करीत असताना. सजगपणे आणि सकारात्मक वृत्तांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. कारण हल्लीच्या जमान्यात एका सामान्य वाचकांची रूची वेगळे आहे. त्यामुळे वाचकरूचीप्रमाणे पत्रकारांनी लोकशिक्षणासाठी लिखाण करणे गरजेचे असल्यांची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 


    यावेळी उमा महाविद्यालयातील पत्रकारीता विभागातील गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ शिवाजी पाटोळे , ऐश्वर्या विरधे , रेणुका बडवे , प्रिया कुलकर्णी , वैष्णवी कुलकर्णी आणि सायली देशमुख यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे,  सत्यता चे संपादक दत्ताजीराव पाटील आदींसह सर्व आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक संकेत कुलकर्णी यांनी केले. तर आभार संदिप पिटके यांनी मानले. सदरच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत कोळी , तुकाराम लोखंडे , ज्ञानेश्वर देवमारे आदिंनी प्रयत्न केले.  


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments