Video News- सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदचे शानदार उदघाटन...विद्यार्थ्यांना मिळतेय देश-विदेशातील विख्यात संशोधकांचे मार्गदर्शन


Pandharpur Live : 
Video

        पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील  एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करून परिषदची सुरवात करण्यात आली असल्याची माहिती  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
      या परिषदेचे उदघाटन अग्देर नार्वे विद्यापीठातील डॉ. मोहन कोल्हे, झिगाझॅग युनिव्हर्सिटी इजिप्त चे डॉ. एम. ए. तौफीक, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक जी. के. शहाणे, पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. संपत देशमुख आदी मान्यवरांच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व विद्येची आराद्यदैवत असलेल्य सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने या परिषदेचे उदघाटन करण्यात आले.
        महाविद्यालयाच्या वतीने या आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेत सहभागी झालेल्या मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी प्रास्ताविक केले तर प्रमुख पाहुणे डॉ. मोहन कोल्हे, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक जी. के. शहाणे यांनी मनोगत व्यक्त केले.
       या आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदमध्ये 3 जानेवारी रोजी विविध विषयांवर शोध निबंध सादर करण्यात आले. ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. संपत देशमुख, डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अनिल निकम, प्रा. श्रीगणेश कदम, प्रा. महेंद्र काटकर, प्रा. सुभाष पिंगळे, , प्रा. अंजली पिसे, प्रा. शशीकांत गिड्डे आदींसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments